Sunday, 22 August 2021

भिवंडी बाजारपेठेतील चार दुकाने आगीत जळून खाक,सुदैवाने जीवित हानी नाही.!!

भिवंडी बाजारपेठेतील चार दुकाने आगीत जळून खाक,सुदैवाने जीवित हानी नाही.!!


अरुण पाटील (कोपर) भिवंडी, दिं, 22 :
          भिवंडी शहरात आगीचे सत्र सुरूच असून आज सकाळच्या सुमारास पारनाका भागातील बाजारपेठेत असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका दुकानात आग लागली होती. या आगीत चार दुकाने जळून खाक झाली आहेत.
  मात्र सुदैवाने कोणतेही जीवित हानी  झाली नाही.                बाजार पेठेमधील एका इमारतीच्या तळ मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत इमारतीमधील लेडीज टेलर, साड्या, महिलांच्या कपड्यांची अशी चार दुकाने जळून खाक झाली आहे.या  घटनेमुळे  इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
           भिवंडी शहरात आगीचे सत्र सुरूच असून आज सकाळच्या सुमारास पारनाका भागातील बाजारपेठेत असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका दुकानात आग लागली होती. मात्र, सकाळच्या सुमारास इतर दुकाने बंद असल्याने ही आग त्या इतरही दुकानांपर्यत पसरून आगीच्या भक्षस्थानी चार दुकाने पडली.
          शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती अग्निशामक विभागाला मिळताच, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एका तासात आग आटोक्यात आणली आहे. या आगीत दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...