Friday, 17 September 2021

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आरक्षणांतर्गत जागांची भरती न केल्यास 4 ऑक्टोबर रोजी पासून आय टक चा इशारा !!

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आरक्षणांतर्गत  जागांची भरती न केल्यास 4 ऑक्टोबर रोजी पासून  आय टक चा इशारा !!


जळगाव..., ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी जळगाव जिल्हा परिषद मधील रिक्त जागांची भरती 2019 पासून झालेली नाही. ही भरती ताबडतोबीने करण्यात यावी येत्या दोन ऑक्टोबर म. गांधी जयंती पर्यंत न झाल्यास  4 ऑक्टोबर पासून जळगाव जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कर्मचारी बेमुदत उपोषण करतील असा इशारा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आय टक तर्फे जळगाव जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आला आहे .


याबाबत सविस्तर असे की, जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या 10 टक्के आरक्षणाच्या 100 च्यावर जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत कर्मचारी त्याच्या दहा टक्के आरक्षणातून त्यांच्यासाठी आरक्षित जागा त्वरित भरती करावी. भरती करताना 2021 ची सेवा जेष्ठता यादी त ज्यांचे नाव आहेत त्यांच्या नावाचा विचार व्हावा वर्ग-3 व वर्ग-4 साठी सरकारने ठरवलेली मूळ शिक्षण पात्रता नुसार भरती व्हावी तसेच ही भरती  दलाल मध्यस्थ यांचे हस्तक्षेप विना पारदर्शी व्हावी तसेच 2020 साली कोबिड महामारीमुळे भरती रखडली त्यामुळे सेवाज्येषठता यादीतील 45 वर्षे वयाच्या कर्मचाऱ्यांना 1 वर्षे यादीत ठेवण्याची संधी द्यावी. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत भरतीची कार्यवाही न झाल्यास 4 ऑक्टोबर 2021 पासून ग्रामपंचायत कर्मचारी जळगाव जिल्हा परिषदेसमोर  बेमुदत उपोषण करतील असा ईशारा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सहसचिव अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वाखालील सर्वश्री संदीप देवरे शिवशंकर महाजन राजेंद्र कोळी रमेश पाटील अनंता कराळे गणेश सुरवाडे लक्ष्मण बिऱ्हाडे रवींद्र पाटील सतीश परदेशी भगवान पाटील प्रमोद शेळके प्रकाश कोळी अतुल बऱ्हाटे यांच्या शिष्टमंडळाने दिला आहे. 


सदर निवेदन जिल्हा परिषद चे ग्राम पंचायत विभागाचे कक्ष अधिकारी श्री वाय. डी. मराठे साहेब यांना देण्या त आले

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...