Friday, 17 September 2021

माणगाव वाहतूक पोलीस शाखे मार्फत चालक दिनानिमित्त वाहन चालकांचा गौरव !!

माणगाव वाहतूक पोलीस शाखे मार्फत चालक दिनानिमित्त वाहन चालकांचा गौरव !!


       बोरघर / माणगांव  (विश्वास गायकवाड) : देशातील दळण-वळण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे वाहन चालक, वाहन चालकांचे देशाच्या परिवहन आणि दळणवळण क्षेत्रात अनन्य साधारण अशी भूमिका आहे. तसेच चालकांचे देशाच्या विकासामध्ये आणि जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान आहे.याबाबत चालक या घटकांचे गुणगौरव करण्याच्या दृष्टीने दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस चालक दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 
       त्या दिनानिमित्ताने या दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अशोक दुधे साहेब व महाड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव वाहतूक पोलीस शाखे मार्फत वाहन चालकांचा चालक दिनानिमित्ताने श्रीफळ, गुलाब पुष्प, व मास्क देऊन गौरव करण्यात आला. तसेच या वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांबद्द्ल मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी माणगाव वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस श्री. लालासाहेब वाघमोडे, निवास साबळे, बापू शिंदे, महिला पोलीस हवलदार विमल ठाकूर इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...