'अ' प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा सुळसळाट !!
'लेखी तक्रार करूनही कारवाई नाहीच'
"क.डों.म.पालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याने अ प्रभाग क्षेत्र अधिकारी बदलण्याची मागणी".
संदीप शेंडगे / कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू असून चाळ माफिया व अनधिकृत इमारत बांधणार यांचे चांगलेच फावले आहे.
'अ' प्रभाग क्षेत्रातील मोहने गाळेगाव अटाळी वडवली कल्याणी मांडा टिटवाळा इंदिरा नगर आदी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे तयार होत असून पालिकेच्या आरक्षित भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे तयार झालेले आहेत याबाबत नगरसेवक व नागरिक मोठ्या प्रमाणात तक्रार करून सुद्धा या अनधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने तक्रारदार हतबल झाले आहेत. अधिकारी-कर्मचारी मस्तवाल झाले आहेत.
दोन महिन्यापासून मोहने येथील मुख्य चौकातील अनधिकृत बांधकामाची नगरसेविका सुनंदा मुकुट कोट यांनी तक्रार करून सुद्धा अद्यापही या कामावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने नगरसेवकांसह नागरिक चांगलेच संतापले असून अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी मात्र मुजोर झाले असून अनधिकृत बांधकामावर कारवाई करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकार्यांचा कोणत्याही सकाळचा धाक नसून सरळ सरळ वसुली सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. अनधिकृत बांधकाम विभागाकडे तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची प्रतिमा मलीन होत असल्याने 'अ' प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांची तातडीने बदली करण्याची मागणी सत्याग्रह फोरमचे राष्ट्रीय संघटक भरतकुमार सोनार यांनी केले आहे. गेल्या सहा महिन्यात 'अ' प्रभाग क्षेत्रात शेकडोंच्या वर अनधिकृत बांधकामे तयार झालेले आहेत. अनेकदा अनधिकृत बांधकामांच्या वृत्तपत्रात बातम्या येऊन सुद्धा वृत्तपत्रांना केराची टोपली दाखविण्यात येत असल्याने पत्रकार चांगलेच संतापले आहेत याविरोधात बाळकडू पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उमेश जाधव यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची त्यांना माहिती देण्यात येईल असे जाधव यांनी सांगितले आहे.
'अ' प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम विभाग आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी हे केवळ नावालाच पालिकेत उपलब्ध राहत असून कारवाई मात्र शून्य आहे. त्यामुळे असे निष्क्रिय प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि बांधकामातील पथकातील कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सत्याग्रह फोरमचे राष्ट्रीय संघटक भरत कुमार सोनार यांनी केली आहे.
येत्या सात दिवसात प्रभाव क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्यास पालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे भरत कुमार सोनार यांनी सांगितले आहे.




No comments:
Post a Comment