अभियंता दिनी भाजयुमोची गांधीगिरी, रस्त्यावरचे खड्डे बुजवून दिन साजरा करणे सार्थकी लागेल असे आव्हान - जिल्हा अध्यक्ष सारंग मेढेकर
ठाणे, दि. १५ (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अभियंता दिन साजरा होत असताना भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे शहर जिल्हाच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांना गुलाबाचे फुल देऊन आव्हान केले अभियंता दिन साजरा करण्यापेक्षा रस्त्यावर पडलेले खड्डे अगोदर भरून लोकांचे जीव वाचण्यास आणि ट्रॅफिक कमी होण्यास मदत होईल.
ठाण्यातील घोडबंदर रोडसह इतर प्रमुख रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे ठाणेकर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहनांच्या दुरुस्ती खर्चात वाढ, वारंवार मोठ्या वाहनकोंडीसह अपघातांचे प्रमाण वाढले आहे. भाजपा कायम या विषयावर आवाज उठवत असते. परंतु परिस्थिती जैसे थे राहून तात्पुरती डागडुजी करण्यात येते. खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. त्यामुळे ही परिस्थिती बदलल्यास अभियंता दिन साजरा करणे सार्थकी लागेल. त्वरित खड्डेमुक्त रस्ते करण्यात यावे असे भाजयुमो जिल्हा अध्यक्ष सारंग मेढेकर यांनी सल्ला दिला.

No comments:
Post a Comment