गेला तो पुर राहिल्या त्या आठवणी, ऐतवडे बुद्रुक येथील स्मशानभूमीचा आत्मा गेला उडून तर बैठकीचे शरीर झाले खिळखिळे?
कल्याण, (संजय कांबळे) ? : महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक ठरलेल्या शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गाव असलेल्या ऐतवडे बुद्रुक येथील गाव ओड्यास आलेल्या पुरामुळे दलित स्मशानभूमीची अवस्था आत्मा उडून गेल्यासारखी झाली असून बैठक व्यवस्था दुर्रद आजाराने शरीर खिळ खिळे होते त्याप्रमाणे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केली जाणारी दुरुस्ती तरी चांगल्या मटेरिअल ने व्हावी ऐवढीच माफक अपेक्षा आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. थोर समाजसुधारक आणि शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे हे गाव ,तर स्वातंत्र्य संग्रामात सातारा जेल फोडून इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणारे स्वातंत्र्यवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी याच गावात आसरा घेतला होता. प्रांरभी एकत्र असणारे गाव आज छोट्या मोठ्या वाड्या वस्ती मध्ये विभागले गेले आहे. करजंवडे रस्ता वस्ती, गौतम नगर, गुरवाचा माळ वस्ती, कावखडी, गंजीखाना, अशा वस्तीने गावाचे विभाजन झाले आहे. गावात प्रामुख्याने बाजारपेठ स्मशानभूमी व खाली ओढ्याकडिल दलित स्मशानभूमी अश्या दोन स्मशानभूमी आहेत.
तर गावात राकूस ओढा, मुख्य ओढा व मागला ओढा असे तीन ओढे आहेत. याच मागला ओढा व मुख्य ओढा यांना मागील महिन्यात मोठा पूर आला. हा इतका भयानक होता की पाण्याच्या प्रवाहाच्या आड जेजे आले ते सर्व आडवे करत वाहून गेले यामध्ये नवीनच बनविण्यात आलेल्या पुलाचा काही भाग, स्मशानभूमी ,आणि स्मशानभूमीची बैठक व्यवस्था हे पुर्णपणे वाहून गेले. या पुरामुळे ओढ्यावरील पुल, स्मशानभूमी व बैठक व्यवस्था यांच्या कामांचा दर्जा देखील समोर आला.
हे चित्र पाहिले की, मृत शरीरातील आत्मा उडून गेल्या नंतर शरीर कसे निपचित पडते,असे वाटते तर स्मशानभूमीची बैठक व्यवस्था म्हणजे एखाद्या दर्रद आजाराने शरीर कसे खिळ खिळे होते, अशी दिसून येते. असो.
सध्या या स्मशानभूमीची दुरुस्ती सुरू आहे. खांब उभे केले आहेत. बाधकांम साहित्य मध्ये रेती दिसून येत नाही. तर इतर साहित्य कसे वापरण्यात येते यावर ही स्मशानभूमी भविष्यात पृथ्वीतलावर राहते की आताच्या प्रमाणे वैकुंठवाशी होते. हे येणारा काळच ठरवेलं, तर बैठक व्यवस्था व पुलाचा खचलेला भाग यामुळे हे अजून किती दिवस तग धरतील हे सांगणे कठीण आहे. म्हणून प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष द्यायला हवे.




No comments:
Post a Comment