Sunday, 19 September 2021

संघटनेच्या दणक्याने "कॅम्ब्रिया इंटरनॅशनल स्कूल" चे प्रशासन आले वठणीवर...!

संघटनेच्या दणक्याने "कॅम्ब्रिया इंटरनॅशनल स्कूल" चे प्रशासन आले वठणीवर...!


कल्याण, (प्रतिनिधी) - आरटीई अर्थात 'मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिकार कायदा' या कायद्यांतर्गत मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.(अल्पसंख्यांक नोंदणी शाळा वगळून) प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना भेदभावाची वागणुक न देता इयत्ता ८ वी पर्यंत शैक्षणिक फी माफ करुन शालेय पाठ्यपुस्तकांसह आवश्यक ते शैक्षणिक साहित्य शाळेचा गणवेष इ. मोफत देण्याची तरतूद आहे. परंतु काही शाळा शासनाकडून आम्हाला आवश्यक तेवढा निधी / अनुदान  वेळेवर प्राप्त होत नाही अशी कारणे देऊन पालकांना शैक्षणिक साहित्य, शालेय पाठ्यपुस्तके व इतर सुविधा देण्यास टाळाटाळ करतात. या योजनेतंर्गत प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे एक तर मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटकातील बहुतांश चाळीत राहणारे असल्याने त्यांच्या पालकांना हिणवले जाते. एक्स्ट्रा अ‍ॅक्टिव्हिटीजच्या नावाखाली अतिरिक्त शुल्काची मागणी केली जाते.

गुरुकृपा चॅरिटेबल ट्रस्टची "कॅम्ब्रिया इंटरनॅशनल स्कूल" खडकपाडा, कल्याण. येथे असुन या शाळेत प्रवेश मिळालेल्या गणेश हरीनामे या अनुसुचित जातीच्या पालकाला, शालेय प्रशासनाच्या सदस्याने शाळेत बोलावून 'आमच्या शाळेची पाठ्यपुस्तके बाहेर देशात छापली जातात, भारतीय पाठ्यपुस्तकांच्या तुलनेत त्यांची किंमत जास्त असते. शासनाकडून आम्हाला तेवढी रक्कम दिली जात नाही त्यामुळे तुम्हाला पुस्तकांचे पैसे भरल्यानंतरच पुस्तके मिळतील. तसेच तुमच्या पाल्याला इतर अ‍ॅक्टिव्हिटीज मध्ये भाग घेता येणार नाही. त्याचे अतिरिक्त वार्षिक शुल्क भरावे लागेल तेंव्हाच भाग घेता येईल. असे सांगुन आमच्या उक्त नियम आणि अटींच्या कागदपत्रांवर सही करुन द्या अशी सक्ती करीत असल्याची तक्रार गणेश हरीनामे यांनी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य, प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित यांच्या कडे केली होती. त्या अनुषंगाने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे आदेशाने पिडीत पालक गणेश हरीनामे यांचे सोबत प्रदेश-सरचिटणीस अण्णा पंडित, राजन गायकवाड, स्वाभिमानी शिक्षण संघटनेचे संजय गायकवाड, राजु शिंदे, सुनील चव्हाण, दिनेश पुजारी इत्यादी कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ शालेय प्रशासनाचे भेटी साठी गेले असता मुख्याध्यापक व आरटीई चे काम बघणारे सदस्य मिटींग मध्ये आहेत. अपॉइंटमेंट शिवाय त्यांना भेटता येणार नाही. तुम्ही तुमचा नंबर द्या तुम्हाला भेटीची वेळ कळवू तेंव्हाच भेटायला या असे सांगुन भेट नाकारण्यात आली. संघटनेच्या वरील शिष्टमंडळाने विलंब न करता तातडीने शिक्षणाधिकारी तडवी यांची भेट घेतली. कॅम्ब्रिया इंटरनॅशनल स्कूल ची मौखिक तक्रार करुन वरिल प्रकार त्यांचे निदर्शनास आणून दिला.शालेय प्रशासनाने पिडीत गणेश हरीनामे यांना व त्यांच्या सारखे इतर पालकांना न्याय न दिल्यास अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व स्वाभिमानी शिक्षण संघटनेच्या माध्यमातून तिव्र आंदोलन छेडण्याचा मौखिक इशारा शिक्षणाधिकारी यांना देण्यात आला. याची दखल घेऊन शिक्षणाधिकारी तडवी यांनी शाळा प्रशासनाची कान उघडणी केल्या नंतर कॅम्ब्रिया इंटरनॅशनल स्कूल प्रशासन वठणीवर आले. पिडीत पालक गणेश हरीनामे व संघटनेच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांनी ताबडतोब विनामूल्य शालेय पाठ्यपुस्तके देवुन ऑनलाईन लेक्चरचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येईल तसेच शाळा सुरू झाल्यानंतर गणवेशाचे वाटप केले जाईल तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना भविष्यात भेदभावाची वागणुक दिली जाणार नाही असे अभिवचन प्रशासनाच्या वतीने शाळा मुख्याध्यापकांनी दिले. आपणास न्याय मिळवून दिल्याबद्दल अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष रविंद्रदादा जाधव, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉ. रमेश सावंत, प्रदेश-सरचिटणीस अण्णासाहेब पंडीत. संजय गायकवाड (स्वाभिमानी शिक्षण संघटना) व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांचे गणेश हरीनामे यांनी आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...