Tuesday, 14 September 2021

आजीच्या वाढदिवसा निमित्त नातवाने खाऊच्या पैशातून गरजूंना जीवनावश्यक धान्य वस्तू वाटप करुन समाजासमोर ठेवला एक नवा आदर्श !

आजीच्या वाढदिवसा निमित्त नातवाने खाऊच्या पैशातून गरजूंना जीवनावश्यक धान्य वस्तू वाटप करुन समाजासमोर ठेवला एक नवा आदर्श ! 


     बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री तथा शेतकरी कामगार पक्षाच्या जेष्ठ नेत्या मिनाक्षीताई पाटील यांचा वाढदिवस या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वादशेठ पाटील व माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्राताई पाटील यांचा धाकटा चिरंजीव कु.अर्णव पाटील याने आपल्या वर्षभर साठवलेल्या ( पॉकेटमनीच्या) अर्थात खाऊच्या पैशातून वाघोडे ग्रामपंचायत हद्दीतील ज्ञानवाडी येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्याचे किट तर लहान मुलांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाऊवाटप केल्याने पाटील घराण्याच्या ह्या छोट्या शिलेदाराचे सगळीकडेच कौतुक होत आहे.
      सध्याच्या आधुनिक जगामध्ये बच्चे कंपनी मोबाईल व ऑनलाईन गेम्सच्या आहारी जात असताना, पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबातर्फे अखंड चालू असलेले समाजसेवेचे व्रत व त्याची जाणीव ठेऊन समाजाप्रती आपली असलेली जबाबदारी ओळखून कु.अर्णव याचा हा प्रयत्न अनेक लहान मुलांना वेगळी ऊर्जा व प्रेरणा देणारा आहे, पालकांकडून मिळालेल्या पॉकेटमनी मधून ऑनलाईन गेम्स, व्हिडिओगेम्स विकत घेण्यापेक्षा तेच पैसे काही लोकांचे संसाराला हातभार लावू  शकतात ही जाणीव एवढ्या कमी वयात असणे हे फार अभिमानास्पद आहे, याच निमित्ताने कु.अर्णव याने सांगितले कि मागील एक वर्षांपासून मी मला आई बाबांकडून मिळालेली पॉकेटमनी साठवत होतो व शाळादेखील ऑनलाईन असल्याने माझे सगळेच पैसे शिल्लक राहत होते. त्यामुळे या पैशातून मी माझ्या आज्जीला वाढदिवसानिमित्त भेटवस्तू घेण्याचे ठरवले होते. पण भेटवस्तू काय घेऊ जी आज्जीला आवडेल असा विचार केल्यावर ठरवले कि आज्जीने तीचं पूर्ण आयुष्य लोकांसाठी खर्ची घातलेल आहे. त्यामुळे गोरगरीब लोकांना मदत करणे हीच आज्जीला तिच्या वाढदिवसा निमित्त सगळ्यात मोठी भेटवस्तू ठरेल म्हणून मग साठवलेल्या सर्व पैशामधून सर्व सामान्य जनतेला रोज लागणारे अन्नधान्य व गणपती सणाकरीता लहान मुलांना बिस्किटे, चिवडा,वेफर्स असा खाऊ विकत घेतला. आणि तो इथे येऊन वाटला आहे,इकडे आजूबाजूला फिरल्यानंतर लक्षात आलं कि आतापर्यंत खुप चांगला विकास आपल्या भागात शेतकरी कामगार पक्षातर्फ झालेला असुन यानंतर सुद्धा आपल्या विभागातील सर्व समस्या सोडवण्या करीता शेकाप मार्फत आम्ही सगळेच कायमच प्रयत्नशील राहू, सदर जीवनावश्यक वस्तू व खाऊ वाटप प्रसंगी माजी अर्थ व बांधकाम सभापती सौ. चित्राताई पाटील, पंचायत समिती सदस्या रचना थोरे, शेकाप युवानेते निलेश थोरे, वाघोडे सरपंच कृष्णा जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...