कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गौरी गणपती विसर्जनात वाहतूक कोंडी टळली !!
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या चांगल्या नियोजनामुळे कल्याण मुरबाड महामार्गावर असलेल्या म्हारळ, वरप,कांबा या परिसरात गौरी गणपती विसर्जन दरम्यानवाहतूक कोंडी झाली नाही. खड्डे आणि पावसामुळे वाहतुकीत अडचणी येत होत्या.
काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी गणेशोत्सव विसर्जन च्या पाश्र्वभूमीवर कल्याण तालुक्यातील पाचवामैल, रायते, टिटवाळा आदी विसर्जन स्थळांची पाहणी केली होती. त्या धर्तीवर कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांना सूचना देण्यात आल्या, त्या नुसार त्यांनी अत्यल्प कर्मचारी असताना व्यवस्थित नियोजन केले. सगळ्या महत्त्वाचे म्हणजे कल्याण मुरबाड मार्गावर गणेशोत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते ही परपंरा आहे. त्यामुळे यावेळी म्हारळ पोलीस चौकी येथे बँरेकेट लाऊन उल्हासनगर शहरातील गणपती विसर्जनासाठी आलेले वाहने ही परत पाठविण्यात आली. वरप, पाचवा मैल, व रायते येथे केवळ याच भागातील गणपती विसर्जन वाहने सोडण्यात येत होती, त्यामुळे म्हारळ, वरप कांबा या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली नाही.
म्हारळ पोलीस चौकीचे पोलीस इन्स्पेक्टर रंगराव पवार व त्यांचे सहकारी उल्हासनगर येथून येणाऱ्या वाहनांना समजावून परत पाठवित होते.
कल्याण मुरबाड मार्गावर खड्डे मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील वाहनांची थोडीफार कोंडी होत होती. पण एकूणच गणेशभक्तांना जादा त्रास खड्डे व चिखल यांचाच झाला.


No comments:
Post a Comment