गोल्डमिडलिस्ट गौरी पाटील व पत्रकार संजय कांबळे यांचा भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा यांच्या कडून सत्कार !
कल्याण, (प्रतिनिधी) : सोलापूर येथे झालेल्या ग्रफलिंग रेसलिंग स्पर्धेत गोल्ड मिडेल मिळवलेल्या वरपच्या गौरी पाटील आणि आपल्या परिणामकारक बातमीदारीने अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यारे याच गावचे पत्रकार संजय कांबळे यांचा सत्कार भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा यांच्या वतीने नुकताच कल्याण मधील कोलम येथे करण्यात आला.
एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस ची कोरोओग्राफर तथा आघाडी ची कलाकार कु गौरी तूळशीराम पाटील हिने महाराष्ट्र स्टेट ग्रफलिंग रेसलिंग चँपियनशीप स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात सोलापूर येते गोल्ड मेडल पटकावून प्रथम क्रमांक पटकावला होता. तर गेली २०/३० वर्षे कल्याण तालुक्यात परिणाम कारक पत्रकारीता करून अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रश्न सोडविणारे पत्रकार संजय कांबळे यांचा सत्काराचे आयोजन भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधासभा यांच्या तर्फे कल्याण तालुक्यातील कोलम येथे करण्यात आले होते.
ओबीसी संघटनेचे नेते संतोष राऊत यांनी पत्रकार संजय कांबळे यांचा शाल श्रीफळ, देऊन सन्मान केला तर कु. गौरी तूळशीराम पाटील हिचा सत्कार कल्पना राऊत, सुनदा राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना युवा मंचाचे प्रमुख भरत दळवी यांनी पत्रकार संजय कांबळे यांनी केलेल्या सामाजिक कामाची उपस्थितांना माहिती दिली, फळेगाव आबांर्जे रस्ता, गोवेली ठाकूरपाडा येथील आदिवासी बांधवांना बोरवेल चे शुद्ध पाणी, म्हारळ गावात प्रिती अँकेडमी शाळेत लसीकरण केंद्र, वरप कोविड केअर सेंटर, आदी विविध प्रकारची कामे भरत दळवी यांनी सांगितले.
यावेळी कल्याण सापाड, उबार्डे चे सामाजिक कार्यकर्ते विकास कारभारी, जेष्ठ नागरिक गोपाळ भोईर, प्रसाद राऊत, जयवंत भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.





No comments:
Post a Comment