कल्याण शहर वाहतूक शाखेचे वार्डन म्हणजे 'चायपेक्षा किटली गरम, सामाजिक कार्यकर्ते करणार तक्रार !
कल्याण, (संजय कांबळे) : शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी, वाहतूक पोलिसांना मदत व्हावी यासारख्या चांगल्या उद्देशाने शहर वाहतूक शाखेला वार्डन देण्यात आले. मात्र सध्या हे वार्डन साहेबापेक्षा मोठे झाले की काय? असे घडणाऱ्या प्रंसगावरुन दिसून येत आहे.
कल्याण शहरासह परिसरात झपाट्याने नागरीकरण होते आहे, लोकसंख्या वाढत असताना वाहनांची संख्या कित्येक पटीने वाढत आहे, असे असूनही रस्ते मात्र वर्षानुवर्षे तसेंच आहेत. अशातच रस्त्यावर फेरिवाले व इतरांचे अतिक्रमण, कोणीही कुठेही उभी केलेली वाहने या सर्वाचा परिणाम म्हणून वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलीस इमानेइतबारे काम करतात, पण त्यांचीही संख्या कमी असल्यामुळे कामाचा ताण पडतो. या सगळ्यावर थोडाफार उपाय म्हणून वार्डन ही बाब समोर आली. वाहतूक कोंडी दूर करण्यासह काही मुलांना काम देखील मिळाले. पण दिवसेंदिवस हे वार्डन नागरीकांवर 'बर्डन' बनण्याचा प्रयत्न करू लागले, याना वाहनांची कागदपत्रे तपासण्याचा कोणताही अधिकार नसताना आरटीओ प्रमाणे हे गाड्या थांबून कागद पत्रांची मागणी करू लागले, या मागील हेतू इतकाच की "वसूली"?
कल्याण शहरातील, शहाड, दुर्गाडी व गांधारी हे तीन ठिकाणे अशी आहेत की येथे ड्युटी घेण्यासाठी वार्डन व त्यांचे बाँस यांची वरीष्ठांच्या मर्जीला उतरण्याची तयारी असली पाहिजे. या ठिकाणाहून दररोज शकडो अवजड वाहने, डंपर, भाजीपाला गाड्या, रेती, मातीच्या गाड्या, कालीपिली चालू असतात. या गाड्यांचे "फंटर"या वार्डन व त्यांच्या बाँसच्याच जवळपास बसलेले असतात, आपल्या गाड्या पास करुन घेणे ही त्यांची जबाबदारी असते. या वाहनाकडे परवाना, राँयल्टी किंवा इतर कागदपत्रे असो वा नसो,अडवतो कोण? कारण काय तर 'आर्थिक' हितसंबंध,? इतकेच काय तर एका वार्डनने आपली गाडी ताबडतोब दुरुस्त का केली नाही, म्हणून चक्क गँरेज वाल्याला 'तूला बघतो, तूझी गाडी रस्त्यावर कशी चालते, मी शहाड नाक्यावचं आहे, असा दम दिला ,त्यामुळे या सर्वांची हिंमत कशी होते,याचा विचार करावा लागेल. रात्री नाईट करणारे वार्डन व त्यांच्या बरोबर असणारे पोलीस दादा सकाळी पिशव्या भर भरुन 'बोजा'घरी आणतात. हे ते नाकारु शकतात का?
अर्थात सगळे पोलीस किंवा वार्डन वाईट नाहीत, असे कितीतरी वार्डन आहेत की ते इमानेइतबारे काम करतात, अनेकांनी चोर पकडून दिले आहेत. त्यांचा वरिष्ठांनी सन्मान देखील केला आहे. पण अशातही नोकरदार मंडळी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, लोकप्रतिनिधी आदीना त्यांच्या विविध कामासाठी वेळेत इच्छित पोहचणे गरजेचं असत. आणि नमके अशा वेळी हे वार्डन व त्यांचे बाँस, बाँर्डर क्रास करुन आल्याप्रमाणे वागणूक देतात. यातूनही समोरच्या कडून आपली ओळख दिल्या नंतरही पोलीस, "काय'द्याचे बोला असे वागत असतील तर अशा कर्मचाऱ्यांच्या वर कारवाई व्हायला हवी. असे एका सामाजिक कार्यकत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले तसेच आपण मोबाईलवर काही वार्डन व त्यांचे बाँस पैसे घेतांना शुट केले आहे ते वरीष्ठांना दाखवून लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*प्रतिक्रिया
*उमेश माने पाटील (सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग)- असा काही प्रकार झाला असेल व माझ्या कडे तक्रार आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल व सूचनाही देण्यात येईल.
*विकास कारभारी (सामाजिक कार्यकर्ते, कल्याण)-कल्याण डोंबिवली महानगरपालिका आर्थिक संकटात असताना या वार्डन चा पगार देतात, कारण नागरिकांना वाहतूक कोंडी चा त्रास होऊ नये म्हणून, पण हे काय करतात, याची आयुक्तांनी चौकशी करायला हवी,.


No comments:
Post a Comment