कोकण सुपूत्र संगीतकार शैलेश कांबळे यांना "युवा कला गौरव" पुरस्कार जाहीर !!
कोकण - (दिपक कारकर) :
आर्ट बिट्स फाउंडेशन, पुणे (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने प्रतिवर्षी कलाक्षेत्रात कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीचा 'युवा कला गौरव पुरस्कार - २०२१' गुहागर तालुक्यातील रानवी गावचे भूमिपुत्र "शैलेश कांबळे" यांना संगीत क्षेत्रातून जाहीर झाला आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणती न कोणती कला ही अवगत असते. आपल्या कलेला उंच शिखरावर नेण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन तिथपर्यंत मजल मारणाऱ्या व्यक्तींना यश हे निश्चितच मिळत असते.
असंच लहानपणीच घरातूनच संगीताचा वारसा लाभल्याने संगीत क्षेत्रातील आवड असणाऱ्या शैलेश यांनी रियालिटी शो, अल्बम, अनेक मराठी बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील गायक, संगीतकारां सोबत काम करत अनेक प्रकारची वाद्य वाजवली आहेत. यामध्ये चॅनेल, स्टुडिओ रेकॉर्डिंग, अल्बममध्ये वाद्य वाजवत या कलेतील ठसा त्यांनी उमटविला आहे. शैलेश कांबळे यांच्या कलेची दखल घेऊन युवा कला गौरव पुरस्कार - २०२१ ऑनलाइन पद्धतीने या पुरस्काराचे वितरण होणार असून त्यांना गौरविण्यात येणार आहे. "कला गौरव" पुरस्कारासाठी निवड झालेल्या शैलेश कांबळे यांचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment