पायाच्या दुर्मिळ आजाराशी झुंज देणाऱ्या तरुणाला 'शाहिर सचिन धुमक चाहते टीम'चा मदतीचा हात !
कोकण - ( दिपक कारकर ) :
स्वतःच जीवन जगता-जगता दुसऱ्यासाठी जगणं हे एक आयुष्यातील वेगळंच जीवन असतं. ही माणुसकी जपण्याचे कार्य 'शाहिर सचिन धुमक चाहते टीम' यांनी केलं आहे. गुहागर तालुक्यातील कोतळूक ( किरवले वाडी ) गावचे युवक संदीप शंकर येद्रे ( वय वर्षे - ३९ ) गेले अनेक महिने पायाच्या आजारावर संघर्ष देत अनेक उपचार करत आहेत. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय बेताची आहे. या आजारातून त्यांना बरे होण्यासाठी आर्थिकरुपी मदत म्हणून 'कवी/गायक/शाहिर सचिन धुमक' ( ढाकमोली ) यांनी आपल्या चाहते टीम तर्फे योगदान देण्याचे पाऊल उचलले. ही संकल्पना कोतळूक गावचे सुपूत्र रमेश भेकरे यांची होती. प्रथमच समूहातर्फे सामाजिक बांधिलकी जपण्याचा हाती घेणाऱ्या या समूहा मार्फत मदतीचा आवाहन करणारा संदेश समूहात टाकण्यात आला याला चाहते मंडळींनी उत्तम प्रतिसाद देत सदर मदत शनिवार दि.११/९/२०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता संदीप येद्रे यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आली. युवा समाजसेवक दिपक कारकर यांच्या हस्ते ही मदत संदीप येद्रे दादांना सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमाला शाहिर सचिन धुमक, प्रदीप कातकर, अनिकेत भागडे, अक्षय सुवरे, पांडुरंग आलीम, गुहागर माझी शान समूहाचे सर्वेसर्वा दीपक कावणकर व त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत रोख रक्कम ₹ १५८४० सुपूर्द करण्यात आली.
'शाहीर सचिन धुमक' यांनी कोकणची लोककला नमन, जाखडी नृत्य, भारुड, भजन या कलेतून कलेचं जतन-संवर्धन व आपलं नावलौकिक करताना आपल्या हातून एक सामाजिक सौख्य राखत हा उपक्रम यशस्वी केल्याने त्यांचेही ह्रदय भरून आले. भविष्यात माझ्या हातून मनोरंजन, प्रबोधन व समाजकार्य चालू राहील असे उद्गार 'शाहिर सचिन धुमक' यांनी बोलताना सांगितले. 'शाहिर सचिन धुमक टीम' चाहते टीम तर्फे प्रथमच राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

या समुहातील शाहिर सचिन धुमक यांनी समाजातील घटकांसाठी आपण काहीतरी देण लागतो व ती आपली सामाजिक जबाबदारी आहे ,या हेतुने शाहिर सचिन धुमक चाहते या समुहावर मदतीचे आवाहन केले आणि सर्वांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपल्या यथा शक्ती नुसार मदत केली त्यामुळे सर्व दान दात्यांचे मनापासून आभार तसेच शाहिर सचिन धुमक आणि ज्यांनी हि संकल्पना मांडली ते रमेश भेकरे साहेब यांचे देखील मी आभार व्यक्त करतो व पुढे देखील आसेच समाजाला उपयोगी पडेल असे कार्य त्यांच्या कडून घडो हि अपेक्षा व्यक्त करतो
ReplyDeleteशाहीर श्री सचिन धुमक आणि त्यांचे चाहते....आणि हा मार्ग दाखवणारे आपल्या वाडीतील श्री रमेश भेकरे यांचे खूप अभिनंदन👌👌👌
DeleteThank you dear
ReplyDeleteखूपच सुंदर काम शाहीर 👌💐💐
ReplyDelete