एकतर्फी प्रेमातून पुण्यात अल्पवयीन मुलीची हत्या ! घटनेतील आरोपींना बारा तासात अटक !!
"भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महासचिव महा. राज्य श्री. अजित संचेती" यांनी कर्तव्यदक्ष बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या "पी आय सौ. अनिता हिरवकर व गुन्हे शाखेच्या टीम"चा शाल व पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार व अभिनंदन.....
पुणे :- पुण्यात एका कबड्डीपट्टू 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बिबेवाडीमध्ये घडली. तीन तरुणांनी या मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स इथं ही घटना घडली.
क्षितिजा नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी इथं आली होती. त्याच वेळी तिथे आलेल्या तीन नराधम तरुणांनी क्षितिजावर कोयत्याने हल्ला चढवला. एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू मुलीचा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.
या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आणि अशावेळी दबाव आणि प्रचंड तणावाचे वातावरण असताना देखील तेथील "पी आय सौ. अनिता हिरवकर मॅडम व गुन्हे शाखेची टीम" बिबवेवाडी पोलीस यांनी बड्या शितापीने आरोपीना 12 तासात अटक केली याबद्दल "भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महासचिव महा,राज्य श्री. अजित संचेती" यांनी बिबवेवाडी पोलीसच्या पी आय सौ. अनिता हिरवकर व गुन्हे शाखेच्या टीमचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन केले व आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी अशे निवेदन केले.
अजित संचेती यांनी आपल्या पत्रकात असे म्हणाले की पोलिसांबद्दल जनतेच्या मनात असलेल्या कटुता व पोलीस काही काम करत नाही हे दूर होणे यासाठी आम्ही जे पोलीस अधिकारी व कर्मचारी असे छान काम करतील आशा अधिकारी व त्यांच्या टीमचे आम्ही सत्कार आणि अभिनंदन करणार यामुळे जनतेच्या मनातले कटुता दूर होईल व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आशा मुळे अजून जोमाने काम करण्याची ओढ व प्रोत्साहन मिळेल.



No comments:
Post a Comment