आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनच्या माध्यमातून श्री. बाबूलाल पाटील यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली !!
"श्री बाबूलाल पाटील.वय : 67 ; राहणार : नवापुर जि.नंदूरबार"
कल्याण, प्रतिनिधि : श्री. बाबुलाल पाटील हे डोळ्यांनी अंध असून त्याना अंब्लिकर हर्नियाचा दोन वर्ष पासून त्रास होता. त्यांची शारिरिक परिस्थिति, वय यामुळे फिटनेसच्या अडचणींमुळे नंदूरबार येथे ऑपेरशन होऊ शकले नाही डॉक्टरांनी नाशिक घेऊन जाण्याचा सल्ला दिला तसेच एक दिवशी आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन श्री. जितेंद्र पाटील यांनी आरोग्य शस्त्रक्रिया शिबिर त्यांच्या ऑफिसला भरवले.
श्री. बाबुलाल पाटील यांच्या मुलाने आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन शस्त्रक्रिया शिबिराच्या मेसेज वाचून त्यांनी श्री. जितेंद्र पाटील यांना संपर्क केला. श्री. जितेंद्र पाटील यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी तेरणा हॉस्पिटल, नेरुळ. नवी मुंबई याठिकाणी रवाना करण्यात आले. श्री बाबुलाल पाटील यांना त्यादिवशी ॲडमिट करण्यात आले. आणि त्यांच्याकडे कुठलाही खर्च न घेता सर्वे रिपोर्ट. औषधी, जेवण आणि ऑपरेशन सर्वे मोफत करण्यात आले. श्री बाबुलाल पाटील यांना आठ ते दहा दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्याची सुट्टी करण्यात आली. आता श्री. बाबुलाल पाटील आपल्या परिवारासोबत एकदम ठणठणीत आहेत त्यांनी "आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील" यांचे खूप खूप आभार मानले.



No comments:
Post a Comment