Friday, 15 October 2021

कल्याण -माळशेज घाट महामार्गावरील आपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येणार म्रुत्युंजय दुत !!

कल्याण -माळशेज घाट महामार्गावरील आपघातग्रस्तांच्या  मदतीसाठी  धावून येणार म्रुत्युंजय दुत !! 

** महामार्ग पोलिसांकडून ओळखपत्र देवून केली देवदूतांची नियुक्ती **


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : कल्याण -माळशेज घाट महामार्गावर वाढलेल्या अपघातांचे प्रमाण पाहता,जो प्रसंगावधान पाहून अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी धावतो तोच खरा देवदुत. असे अनेक देवदुत निर्माण होऊन अपघात ग्रस्तांच्या मदतीला धावून जावेत. यासाठी कल्याण-माळशेज घाट महामार्ग पोलिसांनी म्रुत्यूंजय दुत म्हणून काहींना ओळखपत्र व नियुक्ती पत्र तसेच सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. ज्यामध्ये जेष्ठ पत्रकार नंदकिशोर मलबारी व डॉ. विश्वनाथ पवार यांचा समावेश असून, त्यांची हि सेवा पाहून आमदार किसन कथोरे यानी त्यांना म्रुत्युंजय दुत म्हणून संबोधले आहे. 

महामार्ग वाहतूक पोलीस विभाग उमरोलीच्या  वतीने सुरू करण्यात आलेल्या हायवे म्रुत्यूंजय दुत या संकल्पनेत काम करणा-या देवदूत ग्रुपला ओळख पत्र, एक स्टेचर, प्राथमिक उपचार साहित्य, व विषेश कामगिरी करणा-या देवदुताचा सत्कार असा आयोजीत केलेल्या कार्यक्रमात आमदार कथोरे बोलत होते. तर देवदूतांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की कल्याण - माळशेज घाट रस्त्यावर वाहतूक मोठ्या संख्येने वाढली आहे. म्हणून अपघाताचे प्रमाणही वाढल्याचे दिसुन येत आहे. मात्र या अपघातात जखमी झालेल्या जखमींना तातडीची मदत करण्यासाठी कोणीही पुढे येथ नाही. मात्र आता हायवे म्रुत्यूजंय दुत ही संकल्पना वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने सुरू करण्यात आल्या पासून रस्ता अपघातातील जखमींना तातडीने मदत मिळू लागली आहे. याचे खरे श्रेय तुम्हा देवदुतांना जाते अशी शाबासकी आमदार  कथोरे यांनी उपस्थीत देवदुतांना दिली. रोड अपघात रोखण्याची जबाबदारी फक्त महामार्ग पोलीसांचीच आहे असे न समजता आपणही आपली मानसिकता बदललीतर तर अपघाताचे प्रमाण घटण्यास वेळ लागणार नाही. तर या कार्यक्रमाला खास करून उपस्थीत असलेले ठाणे जिल्हा महामार्ग पोलीस उप अधिक्षक संदिप भागडीकर आपल्या भाषणात म्हणाले की पोलीसांच्या मदतीला नेहमीच ग्रामस्थांची मदत होत असते. पोलीस रेकाँडवर असलेल्या चो-या ,मारामा-या, खुन ,दरोडे यांची चर्चा होत असते .पण अपघात कितीही मोठा असला तरी तो गांभीर्याने न घेता त्या अपघातग्रस्तांची काही तरी चुक असेल अशी चर्चा करून लोक दोन तिन दिवसाने विसरून जातात .अशी खंत भागडीकर यांनी व्यक्त केली. महामार्गावर अपघाताचे वाढते  प्रमाण कसे रोखले जातील या संदर्भात सातत्याने चर्चा होत असते .याचाच एक भाग हायवे मुत्यूंजय दुत ही संकल्पना आहे. आपण सर्व देवदूत म्हणून विषेश कामगिरी करत आहात .त्या बद्दल मी आपणा सर्वांचे कौतूक करतो. वाहन चालविताना हँलमेट, वेगावर मर्यादा, काळजीपूर्वक ओव
ओव्हरटेक याची काळजी घेतल्यास अपघाताला खीळ बसेल व आपण त्याचे पालन कराल. अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात महामार्ग पोलीस निरीक्षक श्रीमती म्रुदुला नाईक, महामार्ग सह पोलीस निरीक्षक किरण मतकर पं.स. चे सभापती दिपक पवार भाजपाचे  जिल्हा सहचिटणीस नितीन मोहोपे. डॉक्टर पवार ,मुरबाड एमआयडीसी आसोशिसयनचे अविनाश पवार यांच्या उपस्थित प्राथमिक उपचार साहित्य, ओळखपत्र वाटप करण्यात आले तर विशेष कामगीरी करणारे देवदूत नंदकिशोर मलबारी व डॉक्टर विश्वनाथ पवार यांचा महामार्ग पोलीस केद्र माळशेज घाट याच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस कर्मचारी संजय घुडे यांनी केले.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...