शिवशक्ति उत्कर्ष मंडळ कासार कोळवणतर्फे दस-यानिमित सभा व वहीपुजन कार्यक्रम संपन्न !!
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर /मोहन कदम) :
महाराष्ट्राची भूमि ही संत, महात्मे आणि पराक्रमी पुरुषांची भूमि आहे। संत ज्ञानदेव, तुकाराम महाराज आदी अनेक संतानी भक्तिमार्गाची शिकवण दिली आणि समाजाला एकत्रित करून माणूसकिचा धर्म शिकविला.
राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांनी अशिक्षित आणि अन्यायाने पिचत पडलेल्या समाजाला त्यांच्या हक्काचे जगणे शिकविले, आणि छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी राष्ट्रभक्ति आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श घालून दिला. हे सर्व कार्य एकट्याने होत नाही त्यासाठी एकात्मतेची भावना असावी लागते. जशी लहान-मोठी पाचही बोटे मिळून वज्रमूठ होते त्याप्रमाणे समाजातील सर्व लहान-मोठे घटक मिळून एका संकल्पाने एका प्रेरणेने एक विकासात्मक दृष्टिकोंन समोर ठेऊन संघटना तयार होते, आणि आपल्या प्रगतीचे एक एक पाऊल पुढे पुढे जात टप्प्या-टप्प्याने आपले ध्येय निश्चित करते. अशा प्रकारचे विलक्षण कार्य रत्नागिरी जिल्ह्यातील, देवरूख पंचक्रोशिमध्ये श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील कासारकोळवण या गावामधील शिवशक्ति उत्कर्ष मंडळ, कासार कोळवण या सरकारमान्य रजि. संस्थेने केले आहे.कोंकणातील दुर्गम भागात सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले हे छोटेशे गाव.शंभो श्री मार्लेश्वर देवस्थानाच्या पवित्र भूमित. श्री सोंबा देवाच्या आशिर्वादाने सामाजिक विकासाची आणि जनहिताची कामे हाती घेऊन सामाजिक क्रांति केली आहे, आणि आपली विशिष्ठ ओळख निर्माण केली आहे. मंडळाच्या त्याच कार्याची दखल घेऊन, प्रभावित होऊन मंडळाला आजवर राष्ट्रीय,राज्यस्तरीय,जिल्हा स्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. श्रीशिवशक्ती उत्कर्ष मंडळ कासार कोळवण या मंडळाची सभा नुकतीच पाच गार्डन वडाळा येथे पार पडली. सभेला एकूण ३५ सदस्यांची उपस्थिती होती. सभेत मागील सभेचे इतिवृत वाचन व मंजुरी, थकीत वर्गणी व अतिरिक्त देणगी बाबत चर्चा, पुढील वाटचाल व उपक्रम याबाबत नियोजन करणे, अध्यक्ष यांच्या परवानगीने येणाऱ्या अन्य विषयावर चर्चा करण्यात आली. कोरोना संकटावर मात करत व प्रवासाच्या गैरसोयीचा सामना करत बहुसंख्खेने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. सभेला अध्यक्ष-रविंद्र सि.करंबेळे, सचिव-शैलेश दळवी, खजिनदार-राजेंद्र करंबेळे, उपखजिनदार-उदय गुरव आणि चंद्रकांत कदम, चंद्रकांत गुरव, रामचंद्र गुरव यांची उपस्थिती होती. समन्वय समितीतील शंकर करंबेळे, पत्रकार मोहन कदम, एकनाथ कदम, दत्ताराम तोरस्कर, सुधीर कलये, गजानन करंबेळे, नंदकुमार गुरव आदीसह अन्य पदाधिकारी,सदस्य व सभासद उपस्थित होते. तरुणांनी कार्यभाग संभाळावा ही इतक्या वर्षाची मनोकामना आज पूर्ण झाली. कारण जुन्या कार्यकारणी प्रमाणेच नविन कार्यकारणीही उत्साहाने काम करात असल्याचे स्पष्ट चित्र यानिमिताने बघायला मिळाले.सर्व नवनिर्वाचीत पदाधिकारी, सदस्याचे मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व सभासद, हितचिंतक यांच्यातर्फे सोने (आपट्याची पाने) लुटून मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या. तसेच येणाऱ्या दिवाळीनिमिताने सगळ्या सभासदानी एकमेकांना शुभेच्छा देत सभेची सांगता करण्यात आली.


No comments:
Post a Comment