Wednesday, 6 October 2021

तालुका कृषी अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्ते खु येथे येथे नाचणी फळप्रक्रिया प्रशिक्षण संपन्न !!

तालुका कृषी अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्ते खु येथे येथे नाचणी फळप्रक्रिया प्रशिक्षण संपन्न !! 


        बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग माणगाव यांचे मार्फत तालुका कृषि अधिकारी माणगाव श्री. आर. डी. पवार यांचे मार्गदर्शनाखाली कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण अंतर्गत नाचणी व फळ प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन मौजे कोस्ते खु. येथे दिनांक ५ /१०/२०२१ रोजी करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी डॉ.सुधाकर पाध्ये, विषय विशेषज्ञ अन्नप्रक्रिया विभाग कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा, यांनी निजामपूर विभागातील उपस्थित बचत गटांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नाचणी पासून प्रक्रिया करून तयार करण्यात येणारे लाडू, पापड, बिस्किटे, केक, तसेच फळांवर प्रक्रिया करून लोणचे, रस इत्यादी बद्दल सखोल मार्गदर्शन केले, 
      या प्रशिक्षणादरम्यान उपस्थित गटातील सदस्यांना डॉ.पाध्ये यांनी नाचणीपासून लाडू तयार करण्याची प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करून दाखविले. या कार्यक्रमासाठी निजामपूर विभागातील जवळ जवळ १० बचत गटातील ९५ महिला सदस्यांनी भाग घेतला. या प्रशिक्षणावेळी श्री आर .ए .शिंदे कृषी पर्यवेक्षक, निजामपूर यांनी उपस्थित शेतकरी गटांना नाचणी पिकाचे महत्व, बाजारातील वाढती मागणी, तसेच विक्री व्यवस्थेबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. प्रमोद शिंदे तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी उपस्थित प्रक्रिया करणाऱ्या शेतकरी गटांना कृषी विभागाचे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेबद्दल माहिती दिली. या योजनेअंतर्गत प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांना ३५ टक्के अनुदान उपलब्ध असून जास्तीत जास्त शेतकरी गटांनी या योजनेत सहभागी व्हावे असे सांगितले. 
      श्रीमती प्रतिभा खिल्लारी कृषी सहाय्यक, निजामपूर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकरी गटांना दिली यामध्ये शेतकरी गटांनी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून मिनी डाळ मिल, मिनी राईस मिल इत्यादी यंत्र घेऊन उद्योग चालू करावे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी कोस्ते खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच मॅडम मा. सौ.आरती पवार मॅडम, स्वदेश फाऊंडेशनचे कॉर्डिनेटर श्री. मुंडे सर, श्री. अविनाश सर, तसेच कोस्ते खु गावातील सर्व बचत गट व निजामपूर विभागातील सर्व गटाचे सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...