मुरबाड तालुक्यातील जयेश वागे ठरला आर्टबिट्स फाऊंडेशनच्या यूवा कला गौरव पुरस्काराचा मानकरी !!
मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : आर्टबिट्स फाऊंडेशन पुणे ,या संस्थेतर्फे दरवर्षी कला ,क्रीडा, शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रासाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.व प्रत्येक विभागातील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या स्पर्धकांना त्यांच्या कलागुणांनुसार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
यंदा या स्पर्धेतील संगीत भजन विभागासाठी तालुक्यातील रावगाव येथील संगीत भजनप्रेमी जयेश वागे या नवतरुणांनी आपला सहभाग नोंदवला होता.आणि त्यांनी या विभागात उत्तम कामगिरी करून **युवा कलागौरव ** हा पुरस्कार पटकावला असुन, जयेश वागे याच्या या उत्तम कामगिरी बद्दल तालुक्यातील सर्वच स्तरातुन कौतुक केले जात असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. मात्र जयेश याच्याशी बातचित केली असता, आपल्याला कला क्षेत्रात संगीत विभागात अजून दमदार कामगिरी करावयाची असुन, मुरबाड तालुक्याचे नाव लौकिक करावयाचे असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.



No comments:
Post a Comment