मुरबाड शहरातील MSEB च्या गलथान कारभाराचा मनसेने केला पर्दाफाश !!
मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : मुरबाड हे तालुक्याचे शहर म्हणून ओळखले जात आहे. मात्र पाच वर्षापुर्वी पर्यंत ह्या शहराचा कारभार ग्रामपंचायत च्या माध्यमातून बघितला जायचा. परंतु पाच वर्षापूर्वी या ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर झाले. आणि एक गाव असलेले मुरबाड आज राज्याच्या नकाशावर झळकु लागले. मुरबाड मध्ये नगर पंचायतीची स्थापना झाली. आणि मुरबाड शहराच्या विकासाचा अश्वमेध वारु चौफेर उधळु लागला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चोहोबाजूंनी विकासकामे होऊ लागली. आणि मुरबाडचा चेहरा बदलु लागला. मात्र जितक्या वेगाने विकासकामे होताना दिसत आहे. तितकिच हि कामे दुर्लक्षित व निष्काळजीपणे होत असल्याचे हि दिसून येत असुन त्याकडे ठेकदार मंडळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेचे मुरबाड शहर अध्यक्ष नरेश देसले यांनी केला असून, शहरातील तोंडलीकर नगर येथील रस्त्याच्या लगत MSEB ने भुमिगत केबलचे काम सुरु असुन ,ओव्हरहेड विजवाहक तारा आता यापुढे काढून डिस्ट्रीब्युशन बाँक्स मधून ग्राहकांना विज जोडणी देण्यात येणार असल्यामुळे थोड्या -थोड्या अंतरावर हे बाँक्स उभे केले आहेत. परंतु ते उभे करताना कच्च्या विटांचे फांऊंडेशन केले आहेत. हे फांऊडेशन एवढ्या वरचेवर केले आहेत. कि, ते भविष्यात कधीही जोराच्या वादळवा-याने सुध्दा कोसळतील व एखादी दुर्घटना घडून जिवितहानी होऊ शकते. कारण तोपर्यंत काम करणारा ठेकेदार बिलाची संपूर्ण रक्कम घेऊन निघून गेलेला असेल. अशी दुर्घटना घडुन आल्यास. त्याला जबाबदार कोण? विजेच्या कामासंदर्भात चाललेला खेळ, कोणाचा जिव घेऊन गेला तर ,याला जबाबदार कोण ? म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड शहर याबाबत संबंधित अधिका-यांना जाब तर विचारणारच, परंतु स्थानिक जनतेने सूध्दा राबाबत वेळीच जाग्रुत होणे हि काळाची गरज असल्याचे मत नरेश देसले. यांनी व्यक्त केले आहे.

No comments:
Post a Comment