जवाहर नयोदय परीक्षा उत्तीर्ण कुमारी मयुरी राहुल गायकवाडचे सर्वत्र स्वागत आणि कौतुक !!
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) : जवाहर नयोदय परीक्षेचा नुकताच निकाल नुकतेच जाहीर झाला या परीक्षेत कुमारी मयुरी राहुल गायकवाड या विद्यार्थिनीने उज्ज्वल यश संपादन करून श्रीवर्धन तालुक्याचा नावलौकिक वाढला त्यामुळे तिच्या यशाचे सर्वत्र स्वागत आणि कौतुक होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातून एकूण १८३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यामधील कुमारी मयुरी राहुल गायकवाड हि एकमेव विद्यार्थीनी उतीर्ण झाली असून तिने श्रीवर्धन तालुक्याचे नावलौकिक केले आहे. तिच्या विशेष सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक ११/१०/२०२१ रोजी पंचायत समिती श्रीवर्धन च्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पंचायत समिती श्रीवर्धन सभापती मा. श्री. बाबुराव चोरगे, माजी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. अविनाश कोळंबेकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीवर्धन मा. श्री.उद्धव होळकर साहेब, मा.सहा. गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीवर्धन श्री बाळासाहेब भोगे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती श्रीवर्धन मा.श्रीमती शीतल तोडणकर, मा. श्री उदय वळवी, मा. श्री अजय वळवी, श्री अंकुश सूर्यवंशी, श्री राहुल गायकवाड, कुमारी तेजस्वीनी गायकवाड.आदी कर्मचारी उपस्थित होते. श्रीवर्धन तालुक्यातून एकमेव विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्याने श्रीवर्धन तालुक्यातून सर्वत्र कुमारी मयुरी गायकवाड चे कौतुक, स्वागत आणि अभिनंदन वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment