Monday, 11 October 2021

शहापूर मध्ये महाविकास आघाडीचा बंद १०० टक्के यशस्वी !!

शहापूर मध्ये महाविकास आघाडीचा बंद १०० टक्के यशस्वी !!


शहापूर,  (एस.गुडेकर) :

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपच्या योगी सरकारने गाडीखाली चिरडून टाकण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला शहापूर तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून शहापूर सह सर्व किन्हवली, वासींद, खर्डी, कसारा या मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या होत्या,


ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने शहापूर शहरात महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने रॅली काढून हत्याकांडात मृत झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवतीर्थ शहापूर येथे सभा घेण्यात आली.

यावेळी आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा, काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे यांनी केंद्र व उत्तरप्रदेश सरकार वर कडाडून टीका केली, कृषी पशुसंवर्धन सभापती संजय निमसे, याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती धिर्डे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मनोज विशे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके, बविआचे तालुका अध्यक्ष योगेश हजारे, प्रहार जनशक्तीचे तालुका अध्यक्ष वसंत पानसरे, आर पी आय सेक्युलरचे केशव साबळे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रकाश भांगरथ, विद्याताई वेखंडे, कॉ. आत्माराम विशे, कॉ. विजय विशे, उपसभापती जगन्नाथ पष्टे, कॉ. संभाजी भेरे, सुभाष विशे, आपर्णताई खाडे, संध्याताई पाटेकर, रवींद्र परटोळे, लक्ष्मण घरत, अंकुश भोईर, असिफ शेख यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी, आय काँग्रेस, प्रहार, भाकप, माकप, मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...