ठाणे जिल्ह्यातील विविध प्रश्नां बाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा तीन दिवशीय राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा.....
कल्याण, ऋषिकेश चौधरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी विशेष मोहीम तसेच कार्यकत्याचे प्रबोधन, भूमिकांचा प्रसार, जनतेच्या प्रश्नासाठी जन आंदोलन, संघर्ष आणि जनतेचा विकास तसेच ठाणे जिल्ह्यात भेडसावणाऱ्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी "राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील" यांच्यासह राष्ट्रवादी नेत्याच्या उपस्थित 23 ऑक्टोंबर ते 25 ऑक्टोंबर 2021 या तीन दिवसांच्या कालावधीत राष्ट्रवादी परिवार संवादाचे आयोजन केले असल्याची माहिती 'प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव' यांनी दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना हिंदुराव यांनी सांगितले की ठाणे जिल्ह्यात बेरोजगारी रस्त्याची दुर्दशा ३५ सेक्शन कायद्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे शोषण कायदा रद्द करावा रेल्वे प्रवाश्याच्या सुरक्षेतेचा प्रश्न, मुरबाड रेल्वे त्वरित सुरू करावी. एक लसीचा डोस पूर्ण झालेल्या नाही रेल्वेने प्रवाशाला परवानगी द्यावी, बेरोजगारांना राष्ट्रीय कृत बँकेकडून व्यावसाय कर्ज मिळावे.
महिलांसाठी स्वयंरोजगार बचतगटांना केंद्रासाठी तालुक्यात एमआयडीसी मध्ये जागा उपलब्ध करून द्यावी तसेच आदिवासी युवकांना उद्योग धंद्यासाठी युवा औद्योगिक वसाहत स्थापन करावी ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात क्लस्टर चे काम प्राधान्याने सुरू करावे तसेच कल्याण तालुक्यात मेडिकल कॉलेज सुरू करावे आदी प्रमुख मागण्या सोडविण्याचा प्रयत्न असणार आहे.



No comments:
Post a Comment