कल्याण ग्रामीण भागात बिबट्याच्या वेगवेगळ्या कथा, दंतकथा, पटकथा, परंतु अस्तित्वाबाबत सभ्रंम कायम ?
कल्याण, (संजय कांबळे) : १६ आँक्टोंबरच्या रात्री पासून सुरू झालेल्या बिबट्या येथे दिसला, तेथे दिसला, तबेल्यात गेला, कोबंडी, कुत्रा खाल्ले, ठसे आहेत, शाळेत आला, सीसीटीव्हीमध्ये कैद झाला, अशा बतावण्या आणि व्हायरल होणारे विडियो, फोटो या बरोबरच वेगवेगळ्या कथा पटकथा दंतकथा यामुळे सध्या कल्याण ग्रामीण भागात दिवाळी अगोदरच खरपुस चर्चा "फोडणी" देऊन सुरू असून गेल्या पाच दिवसापासून वनविभाग बिबट्या चे अस्तित्व शोधत आहे, तसेच अद्यापही त्यांनी काही अपघात केल्याचे काहीही आढळून आले नाही. त्यामुळे त्याच्या अस्तित्वाबाबत सभ्रंम कायम असून तरीही नागरिकांनी सावध राहून काळजी घ्यावी, असे अवाहन वनविभागाने केले आहेत.
शनिवारी सांयकाळी कल्याण तालुक्यातील वसद शेलवली या परिसरात बिबट्या दिसल्याची वार्ता प्रथम समोर आली. यानंतर लगेचच तो गोवेली, ठाकूरपाडा येथे आला, नंतर तो तलावाच्या भिंतीवर चढला, तोपर्यंत मध्येच तो गोवेलीच्या दशरथ चोरगे यांच्या फार्ममध्ये सीसीटीव्ही कँमे-यात कैद झाला, ऐवढेच नव्हे तर त्यांने तेथील कोंबडया व कुत्रे फस्त केले, अशा बतावणी सर्वत्र सुरू झाल्या, ठाकूरपाडा येथील एका महिलेला बिबट्याला पाहून चक्कर आली व ती खाली पडली, तर मधेच कोणी सांगत तिच्या मानेचा घास घेताला, तो पर्यंत एकाने खबर आणली तो गोवेलीच्या सर मारथोमा शाळेत येवून गेला? हे कमी की काय, एका पट्ट्याने तर कहरच केला, तो म्हणाला, आता नुकतीच नवरात्रोत्सव झाला, त्यामुळे तो वाघ रायते येथील वैष्णवी देवी मंदिरात देवीला भेटायला आला होता. या सगळ्या गडबडीत गावागावात स्वंयभू नेते कार्यकर्ते आपल्या व्हाट्सअप ग्रुपवर बिबट्याचे वेगळे विडिओ, फोटो, व्हायरल करु लागले, महिलामध्ये तर तूफान कथा, पटकथा, रसभरीत वर्णन ऐकायला मिळू लागले.
हे ऐवढे विकोपाला गेले की रायते येथील कातकरी वाडीतील एक लहान मुलगा घाबरून एका घरात कोपऱ्यात लपून बसला, तर बाहेर बोंब उठली की वाडीतील मुलाला, बिबट्याने नेले,गोवेलीचे समाजसेवक दिपक जाधव व मंडळीनी शोध घेतला असता तो मुलगा त्यांच्याच घरात सापडला, तो इतका घामाघूम झाला होता की, त्याला ताबडतोब दवाखान्यात नेण्याचा सल्ला जाधव यांनी दिला.
या सगळ्या प्रकाराने कल्याण वनविभाग खडबडून जागा झाला, त्यांनी संपूर्ण टिम सह वेगवेगळ्या भागात नाईट पेट्रोलिंग केले, परंतु त्यांना कुठेच बिबट्याचे अस्तित्व आढळून आले नाही. तसेच काही ठिकाणी मिळालेल्या पायाच्या ठसांची चौकशी केली असता ते हिंंस्त्र प्राण्यांचे ठसे नसून ते तरस किंवा कुत्र्याच्या पायाचे ठसे असल्याचे ठसे तज्ञांचे मत आहे. ऐवढ्यावरच न थांबता जे विडिओ व फोटो सोशलमिडियावर व्हायरल झाले आहेत, त्याबद्दल दशरथ चोरगे यांचा मुलगा रुपेश चोरगे म्हणाला, हा विडिओ २०१९ चा सिमला येथील आहे, तसेच आमच्या सीसीटीव्हीमध्ये कुठेही बिबट्याचे अस्तित्व दिसत नाही, तसेच त्याने आमच्या कोंबड्या किंवा कुत्रे ,वासरू खाल्ले नाही, ते फोटो बोगस आहेत, बिबट्या आपल्या येथे आला हिच अफवा आहे, ऐवढ्या स्पष्ट पणे तो बोलत होता. उलट याचा मला नाहक त्रास होत असल्याचे ही तो सांगायला विसरला नाही.
*समाज माध्यमाची जबाबदारी-सध्या कल्याण तालुक्यात भात कापणीचे दिवस आहेत, अगोदच कोरोनाचे संकट, त्यात अतिवृष्टी, पुर, याचा धोका,?यातून कसेबसे वाचलेले पीक सुरक्षित घरी कसे येईल याची बळीराजाला चिंता लागली असताना, समाजमाध्यम, सोशलमिडिया यांची खूप मोठी जबाबदारी आहे, कारण आपला एक विडियो, फोटो किती नुकसान करु शकतो याचा विचार करा,आपली एक चुकभूल आयुष्य उध्वस्त करु शकते, त्यामुळे संयम बाळगा, शासकीय यंत्रणाशी खात्री केल्याशिवाय कोणतेही फोटो, विडियो व्हायरल करु नका, अन्यथा खरेच एकदा "लांडगा आला रे आला" अशी गत व्हायची, यावर गोवेली येथीलच एकाने नाव न छापण्याच्या अटीवर गंमतीशीर किस्सा सांगितला, तो म्हणाला, जरा थांबा, हे कोंंबड्या,बक-या, चोरून खातील, विकतील व नाव मात्र त्या बिचाऱ्या, बिबटयाचे घेतील!
भले ते काही असो, कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी, व त्यांचे वनपाल, वनरक्षक, गार्ड, हे बिबट्या चा शोध घेत आहेत, तो खरेच असेल तर भात कापणी व गवत कमी झाल्यावर निघून जाईल, त्याने अद्याप पाच दिवसात, कोंबडी, कुत्रे, बकरी किंवा वासरू नेल्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे त्याचे असणे शक्य वाटत नाही, तरीही नागरिक सांगताहेत म्हणून त्यांचे ठसे मिळताता का? पकडण्यासाठी पिंजरा याची सोय करत आहे. तरी नागरिकांनी एकटेदुकटे जंगलात, शेतावर, गवतात जाऊ नये शक्यतो फटाके वाजवावेत व काळजी घ्यावी असे अवाहन वनविभागाने केले आहे.




No comments:
Post a Comment