व्यसनमुक्ती केंद्रात कोविड १९ लसीकरण शिबीर संपन्न !!
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
मिरॕकल फाऊंडेशन मुंबई च्या हितचिंक डॉ. मीना शुक्ला यांच्या प्रयत्नाने, रोटरी क्लब आॕफ वसई यांच्या सहकार्याने आणि वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नारिंगी यांच्या वतीने मिरॕकल फाऊंडेशन मुंबई (मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती उपचार केंद्र) येथे उपचारासाठी दाखल असलेल्या व्यक्तींपैकी एकूण १०६ जणांना कोविड १९ चे लसीकरण करण्यात आले.
याप्रसंगी रोटरी क्लब आॕफ वसई चे बायजू जाॕर्ज व कमलाकर पाटील, मिरॕकल फाऊंडेशन मुंबईचे सुभाष (बाबूजी) मनराय (संस्थापक, अध्यक्ष), राजेंद्र हेगडे (विश्वस्त), रमेश सांगळे (समन्वयक), प्रदीप तक्षक (केंद्र प्रमुख युनिट १), किशोर किणी (केंद्र प्रमुख युनिट २), विराज मनराय (समुपदेशक) उपस्थित होते.तसेच लसीकरणासाठी वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नारिंगी चे डॉ शरद गावित व त्यांचे सहकारी स्विटी संखे (परिचारीका), चेतना संखे (परिचारीका), पूजा पाटील (परिचारीका), ललीता कान्हात (परिचारीका), अजय घोडविंदे (कर्मचारी), अनिल पाटील (कर्मचारी) यासर्वांचे अत्यंत मोलाचे सहकार्य मिळाले.



No comments:
Post a Comment