गोवा येथील स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूची यश !!
कल्याण, प्रतिनिधी :- गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूनी अथलेटिक्स, फुटबॉल आणि क्रिकेट या खेळा मध्ये विशेष चमक दाखवत यश संपादन केले.
या स्पर्धांचे आयोजन स्कूल स्पोर्टस आणि एज्युकेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने करण्यात आले होते. कल्याण च्या खेळाडूंनी फूटबॉल आणि क्रिकेट या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली तर अथलेटिक्स खेळात तनिश्क माजी याने गोळाफेक मध्ये सुवर्णपदक, कृष्णा गुरव याने 1500 मीटर धावणे सुवर्णपदक, प्रसाद गुरव याने 400 मीटर धावणे सुवर्णपदक, आणि साक्षी पाटील हिने 200 मीटर धावणे सुवर्णपदक पटकावले.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक शांती माजी व दिनेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले.



No comments:
Post a Comment