Thursday, 14 October 2021

दहिगाव येथे **मिशन कवच कुंडल ** विशेष कोव्हीड लसीकरण मोहीम संपन्न !!

दहिगाव येथे **मिशन कवच कुंडल ** विशेष कोव्हीड लसीकरण मोहीम संपन्न !!


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : जगभर उद्भवलेल्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभरात संपूर्ण राज्यांत 16 जानेवारी 2021 पासून कोव्हीड -19 लसीकरण मोहीम सुरु केली आहे. 


मात्र 8 आँक्टोबर 2021 ते 14 आँक्टोबर 2021 पर्यंत कोरोना पासून वाचण्यासाठी  "मिशन कवच कुंडल" हि विशेष लसीकरण मोहीम. हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तळागाळातील गोरगरीब जनतेला या मोहिमेचा लाभ व्हावा. 


म्हणून गावपातळीवर गावचे सरपंच यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, यांनी गावात सभा घेऊन प्रथमतः. जनजागृती करावी आणि नंतरच आरोग्य यंत्रणेला पाचारण करून लसीकरण करून घ्यावे. असे आदेश असल्यामुळे मुरबाड तालुक्यातील दहिगाव गावचे सरपंच प्रदिप शिंगोळे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार गावात जनजागृती करून सदर शिबीर राबवुन आपला गाव कोरोना पासून सुरक्षित व संरक्षित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावातील आबाळव्रुद्ध मंडळीनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून लसीकरणाचा लाभ घेतला. 


दहिगाव हे तालुक्यातील एक उच्च शिक्षित,आदर्श लोकवस्तीचे आगरी समाजातील एक गाव. जिथे अनेक रुढी परंपरा, सण उत्सव, एकत्रितपणे साजरे केले जातात. कोरोना काळातही या गावाने एकमताने गावबंदी करून आपले गाव सुरक्षित ठेवले होते. गेल्या दोनवर्षात या गावातील एकाही नागरीकाचा कोरोनाने बळी गेला नाही. गाव सुरक्षित ठेवण्यासाठी सरपंच प्रदिप शिंगोळे यांनी विविध उपाययोजना वेळच्या वेळी राबवुन आपले कर्तव्य बजावले असुन, आजही. लसीकरणात सर्वांना सहभागी करून घेण्यात त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा  सिंहाचा वाटा आहे. तसेच लसीकरणाची सुरवात सुद्धा त्यांनी आपल्या स्वतः पासून केली. याप्रसंगी पंचायत समिती मुरबाडच्या उपसभापती स्नेहा धनगर, सिद्धार्थ धनगर, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत, सदस्य, तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...