मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे गावामध्ये थरार !!
**पोटच्या मुलानेच केली जन्म दात्या वडिलांची चाकूने भोसकून हत्या.**
मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे गावात काळीज पिळवटून टाकणारी चित्त थरारक घटना घडली असुन, चक्क पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची वडिलोपार्जित शेतीच्या वाटपाच्या वादातुन आणी सावत्र नात्याचा रागावरून मूलानेच चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. या बाबत मुरबाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून मुरबाड पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे या गावातील मंगल हरी शेळके वय ५० वर्षे यांची त्यांचाच मुलगा रवी याने धारदार शस्रांनी भोसकून निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटने बाबत जयेश शेळके यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, आरोपी याने फिर्यादीचे वडील मंगल शेळके यांना वडिलोपार्जित शेतीच्या वाटपाच्या वादावरून व सावत्र नात्याचा रागावरून फिर्यादीचा सावत्र भाऊ रवी उर्फ रव्या शेळके याने फिर्यादीच्या वडिलांच्या छातीवर, पोटावर धारदार शस्रांनी भोसकून गंभीर जखमी करून त्यांना जीवे ठार मारले आहे.
या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, सहायक पोलीस निरीक्षक ए. एम. सोनाने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असून, या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे हे करीत आहेत.



No comments:
Post a Comment