Thursday, 14 October 2021

अष्टपैलू कलाकार राजेंद्र सावंत लोकशाहीर विठ्ठल उमप जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित !!

अष्टपैलू कलाकार राजेंद्र सावंत लोकशाहीर विठ्ठल उमप जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

          अष्टपैलू कलाकार राजेंद्र मधुकर सावंत यांच्या अष्टपैलू कार्याची दखल पाक्षिक आदर्श मुंबई व महाराष्ट्र न्यूज- 18 ने  घेऊन त्यांना सन-२०२१ चा "हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्ड कॉम लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार" दिग्दर्शक प्रसाद तारकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले असून त्यांनी कोरोना काळात निस्वार्थपणे सामाजिक सेवा केल्याबद्दल कोरोना योद्धा व काव्य स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक गायन स्पर्धेसाठी  उत्तेजनार्थ व त्यांची कन्या दर्शना राजेंद्र सावंत हिने नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला असून नगरसेविका सुवर्णा ताई करंजे व आदी मान्यवरांच्या हस्ते विक्रोळी आंबेडकर भवन येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले. अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे राजेंद्र सावंत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा साहित्य सांस्कृतिक संगीत नाट्य आदी क्षेत्रात महाराष्ट्राच्या जडणघडणीत विशेष उल्लेखनीय कार्य करत असून त्यांच्या कार्याची दखल अनेक संस्था संघटनेने घेऊन आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.  त्यानी आता "६४ कलामृत" या यूट्यूब चैनलची निर्मिती केली असून या युट्युब चॅनलच्या माध्यमातून विविध कलात्मक कार्यक्रम सादर  करणार आहेत. अशा अवलिया कलाकाराची दखल मुंबई येथील आदर्श मुंबई यांनी अनेक वेळा घेऊन विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून व सोसायटीतील सभासदाकडून तसेच वनिता फाऊंडेशनचे संस्थापक व गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे अध्यक्षा वनिता प्रभाकर कांबळे यानी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !  कल्याण, राजेंद्र शिरोशे : कल्याण तालुक्यात वरप ग्राम...