आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त विक्रोळी कांजूरमार्ग प्रकल्पाच्या वतीने "बेटी बचाव बेटी पढाओ" रॅलीद्वारे जनजागृती !!
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
आंतरराष्ट्रीय दिनानिमित्ताने विक्रोळी कांजूरमार्ग प्रकल्पाच्या वतीने " बेटी बचाव बेटी पढाओ " या विषयावर घोषवाक्य असलेल्या बॅनर द्वारे कन्नमवार नगर व टागोर नगर विभागात बाल विकास प्रकल्प अधिकारी हेमा कटकर व मुख्य सेविका नंदिका काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.
आझादीच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वतीने बाल विकास प्रकल्प स्तारावर " बेटी बचाव बेटी पढाओ" या विषयावर आधारित रॅलीचे आयोजन प्रत्येक अंगणवाडीत करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा, बाल विवाह प्रतिबंध कायदा तसेच मनोधैर्य योजना या विषयावर आधारित रॅलीचे आयोजन मुंबई उपनगर जिल्ह्याचे नोडल अधिकारी स्मिता शेलार यांनी परिपत्रकाद्वारे प्रकल्प स्तरावर तसेच बीट स्तरावर कळवून जनजागृती करण्यासाठी आव्हान केले होते. त्याप्रमाणे प्रकल्पाच्या वतीने विभागातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अंगणवाडी तील मुले पालक गरोदर व स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना घेऊन बेटी बचाव बेटी पढाओ रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आल्याचे मुख्य सेविका नंदिका काळभोर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


No comments:
Post a Comment