गुणवंत कामगारांना राज्यभर एसटी बसचा मोफत प्रवास मिळावा !!
"राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची सरकारकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी".
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगारांना "गुणवंत कामगार पुरस्कार" महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले जाते. अशा गुणवंत कामगारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा मोफत प्रवास व शासकीय विश्रामगृहात राहण्याची सोय मिळावी व इतर मागण्यासंबंधी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक आदिना लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आल्याचे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर व राज्य कमिटी सदस्य यानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..

No comments:
Post a Comment