कल्याणच्या पुणे लिंक रस्त्याचे निष्कृष्ठ दर्ज्याच्या काम रस्त्यावरील चेंबरची झाकणे वारंवार तुटली जात असल्यामुळे अपघाताला आमंत्रण ....
कल्याण, ऋषिकेश चौधरी : कल्याण पूर्वेकडील पूना लिंक रोडच्या सिमेंट काँक्रीटीकरण चे का पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून सदरच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणचे काम देण्यात आलेल्या ठेकेदाराने अत्यंत निष्कृष्ठ दर्ज्याचे काम केले असून या रस्त्यावरील चेंबरची झाकणे वारंवार तुटली जात असून उघड्या चेंबर वाचावीत वाहन चालकाना आपली वाहने चालवावी लागत अनेक वेळा अपघात घडलेले असल्यामुळे रस्त्या मध्ये चेंबरची तुटलेली झाकण्या पासून बचाव करण्यासाठी या चेंबर मध्ये काठ्या किंवा बाबू लावून बाजूने जाण्यासाठी संरक्षण कवच लावले असून रस्त्या मधील चेंबरची तुटलेली झाकणे अपघाताला आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे .
या बाबत कल्याण पुर्वेचे माजी उपमहापौर विक्रम तरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सागितले की पूना लिंक रोड हा राज्य महामार्ग असून या रस्त्याच्या सिमेंटी काँक्रीटीकरणारचे काम अत्यंत निष्कृष्ठ दर्जाचे केल्याने वारंवार या रस्त्यामधील चेंबरची झाकणे तुटत असल्याने या बाबत वारंवार पालिका प्रशासनाने लक्ष वेधून ही पालिकप्रशासन लक्ष देत नसल्याने अपघात वाढत आहेत या रस्त्याच्या कामातील निष्कृष्ठ दर्जा बाबत दोषी असलेला ठेकेदार व पालिकेच्या संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ही तरे यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment