Tuesday, 19 October 2021

डॉ. संजय सोनावणे आणि राजन सोनावणे यांच्या हस्ते रुद्रवली बौद्धजन विकास संस्थेच्या नियोजित बुद्ध विहार नामफलकाचे अनावरण !!

डॉ. संजय सोनावणे आणि राजन सोनावणे यांच्या हस्ते रुद्रवली बौद्धजन विकास संस्थेच्या नियोजित बुद्ध विहार नामफलकाचे अनावरण !!


      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ), रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील इंदापूर विभागात असलेल्या रुद्रवली बौद्धजन विकास संस्थेच्या नियोजित बुद्ध विहाराच्या नामफलकाचे अनावरण रविवारी लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष या विहारासाठी जमीन दान करणारे दानवीर तथा दानशूर व्यक्तीमत्व डॉ. संजय राजाराम सोनावणे तसेच दुसरे जमीन दाते राजन पांडुरंग सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले. या संस्थेचे सुमारे तीस वर्षांपूर्वी बांधलेले जुने विहार मोडकळीस आल्याने या संस्थेने नवीन विहार बांधण्याचा निर्णय घेतला असून सदर विहाराच्या बांधकामासाठी लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष डॉ. संजय राजाराम सोनावणे यांनी रुपये पाच लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केली असून सदर विहारासाठी स्वतःची जागा विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. 
      सदर प्रसंगी डॉ. संजय राजाराम सोनावणे जेष्ठ सल्लागार, राजन पांडुरंग सोनावणे जेष्ठ सल्लागार, निलेश रामचंद्र सोनावणे अध्यक्ष, प्रदीप पांडुरंग सोनावणे उपाध्यक्ष, सतीश रामचंद्र सोनावणे सचिव, मयुर राजन सोनावणे खजिनदार, संतोष सखाराम सोनावणे सभासद, चंद्रकांत मालू सोनावणे सभासद, विजय देवराम सोनावणे सभासद, नरेश अनंत सोनावणे सभासद, श्रीधर पांडुरंग सोनावणे सभासद, प्रथमेश श्रीधर सोनावणे सभासद, मंगेश महादेव सोनावणे सभासद, दिपक चिमाजी सोनावणे, योगेश विजय सोनावणे, रेषा राजन सोनावणे, भारती रामचंद्र सोनावणे, संगीता श्रीधर सोनावणे आणि मनिषा मारूती सोनावणे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...