गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे " राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय एकात्मता सन्मान पुरस्कार." ने सन्मानित !!
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
मैत्री व संकल्प संस्था तसेच सद्भावना संघ, लेक लाडकी अभियान, यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी .जी. पारीख व कामगार नेते मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यावेळी वनिता फाऊंडेशनचे संस्थापक व गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांना सन २०१९ चा "राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय एकात्मता सन्मान पुरस्कार" कामगार नेते व आमदार भाई जगताप यांच्या हस्ते मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन आजाद मैदान सीएसटी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे .कार्यक्रमाला विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारे मान्यवर उपस्थित होते .या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर यांनी केले असून या कार्यक्रमाला सद्भावना संघाच्या वर्षा विद्या विलास, काँग्रेसच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मोनिका जगताप डॉक्टर चेतना दीक्षित, तेजल नाईक, नसरीन शेख, विशाल हिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते .

No comments:
Post a Comment