ठाणे जिल्ह्यातील स्केटिंग खेळाडूंची गगन भरारी !!
"कर्नाटक येथील स्पर्धेमध्ये केला जागतिक विक्रम"
ठाणे :- कर्नाटक येते झालेल्या स्केटिंग स्पर्धेत ठाणे (एरोली) च्या 3 बाल खेळाडूंनी अतिशय चमकदार कामगिरी करत स्केटिंग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे 9 रेकॉर्ड प्रस्थापित केले. ऐरोलीच्या स्केटिंग अकादमी ऑफ इंडियाच्या "लायशा नितेश अगरवाल, सीआ पंक्ती राकेश अगरवाल व रेयांश नितीन असमल्लू" या
वय 6 वर्षाच्या 3 स्केटिंग खेळाडूंनी सलग न थांबता 81 तास स्केटिंग करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आणि या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, राष्ट्रीय रेकॉर्ड, वैश्विक रेकॉर्ड, एशिया पॅसिफिक रेकॉर्ड यांनी घेतली आहे... या रेकॉर्ड बद्दल बोलताना "लॅशा अग्रवाल" हिने सागितले की स्केटिंग ट्रॅक आणि विविध राज्यांच्या स्केटर्सना भेटणे आणि त्यांच्याबरोबर स्केटिंग करणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा अनुभव होता..
तर 'प्रशिक्षक मोहित बजाज' यांनी स्केटिंग ही संपूर्ण शरीराची कसरत आहे आणि ती एकाग्रतेची चांगली पातळी देखील विकसित करते आणि मुलांना तंदुरुस्त ठेवते म्हणून मुले स्केटिंग कडे वळत आहेत असे सांगितले..
- अविनाश
9820991450

No comments:
Post a Comment