Friday, 22 October 2021

काम्रेड विनोद आढलके यांचा मार्क्स वादी कम्युनिस्ट पक्षाला लालसलाम ..! भाकप मध्ये प्रवेश..!!

काम्रेड विनोद आढलके यांचा मार्क्स वादी कम्युनिस्ट पक्षाला लालसलाम ..! भाकप मध्ये प्रवेश..!!


जळगाव, बातमीदार :. .येथे.जिल्हा आयटक व भारतीय कम्युनिस्ट पार्टी जळगांव यांची संयुक्त बैठक जळगांव येथे आज लालबावटा कार्यालय २०/२ बळीराम पेठ, जळगांव या ठिकाणी आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉ. अमृत महाजन आणि भाकप जिल्हा सचिव कॉ. लक्ष्मण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन जळगांव झोनल सेक्रेटरी कॉ . वीरेंद्रसिंह पाटील यांचे अध्यक्षतेखली दि. २०/१०/२०२१ रोजी दुपारी संपन्न झाली. 


सदर बैठकीत  गेली ११ वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांमध्ये कार्यरत काम्रेड विनोद आढळके यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष्यांमध्ये  प्रवेश प्रवेश केला आहे. जळगाव जिल्ह्यात डावी आघाडी उभी राहावी अशी अपेक्षा त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.


त्याना भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये जिल्हा सचिव कॉम्रेड लक्ष्मण शिंदे यांनी पक्ष कार्ड घेऊन रीतसर प्रवेश दिला. या बैठकीत देशभर सद्या सुरू असलेल्या महागाई चा कहर, पेट्रोल डिझेल आणि गॅस जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत त्या विरुद्ध चा लढा, शेतकरी संघटनानी केंद्र सरकारच्या विरुद्ध पुकारलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रणनीती तयार करून जिल्हाभर प्रचार व प्रसार दौरा करून जनजागृती करण्यासाठी नियोजन करणे बाबत, "मनरेगा बचाव शेतमजूर बचाव" तसेच. मुंबई येथील आयटक च्या बैठकीत ठरल्या प्रमाणे शेतकरी कायदे, वीज कायदा संशोधन विधेयक रद्द करणे ,केंद्र सरकारने लादलेले कामगार सहिता रद्द करा आणि सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत मूलभूत गरजा व हक्काचे प्रश्न घेऊन निवेदन पत्र लिहून 1 कोटी नागरिक व सभासदांच्या महाराष्ट्रात सह्या घेऊन पत्र लिहून राष्ट्रपती माननीय कोविंद यांना निवेदन देण्याचे ठरले त्यानुसार जळगाव जिल्ह्यात पंचवीस हजार सह्या घेण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला .केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याची भूमिका तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचा निर्धार करण्यात आला. कॉ. विनोद अढाळके यांचा आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष मध्ये त्यांचे 8 कार्यकर्ते सह प्रवेश प्रक्रिया करण्यात आली... या बैठकीला कॉम्रेड कालू कोळी कॉम्रेड शांताराम पाटील कॉम्रेड बळीराम ढीवर कॉम्रेड भगवान सपकाळे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...