Friday, 22 October 2021

पाण्यासाठी डोंबिवलीतील दावडी विभागात रहिवाश्यांचा हंडा-कळसी वाजवून निषेध !! "कॉंग्रेसचा आंदोलनाला पाठिंबा"

पाण्यासाठी डोंबिवलीतील दावडी विभागात रहिवाश्यांचा हंडा-कळसी वाजवून निषेध !!

"कॉंग्रेसचा आंदोलनाला  पाठिंबा"


कल्याण, ऋषिकेश चौधरी : कल्याण डोंविवली महापालिका  आणि एमआयडीसी प्रशासन डोंबिवली यांच्या कात्रीत सापडून सामान्य नागरिकांची होरपळ होत आहे. 


गेली पाच वर्ष पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या डोंबिवली जवळील दावडी येथील तुकाराम चौकातील मधुकर कॉम्ल्पेस व दिशा संकुल येथील रहिवाश्यांनी इमारतीच्या आवारात हंडा-कळसी वाजवून पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला.येथील रहिवाश्यांचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी कॉंग्रेसने पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाले.पाणी मिळत नसेल तर मतदानावर बहिष्कार टाका असे यावेळी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.    


    डोंबिवली पूर्वेकडील दावडीजवळील तुकाराम चौक येथील मधुबन गॅलक्सी कॉम्प्लेक्स व दिशा संकुल सुमारे ३०० कुटुंबीय गेली पाच वर्ष  पाणी प्रश्न सुटावा म्हणून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.या सोसायट्या पाणी टॅंकर साठी  वर्षाला ३ लाख रुपये खर्च करतात.पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर गुरुवारी येथील रहिवाश्यांनी इमारतीच्या आवारात हंडा-कळसी वाजवून प्रशासनाचा जाहीर निषेध केला. 


यावेळी जिल्हा उपाध्यक्षा वर्षा गुजर –जगताप, जिल्हा उपाध्यक्ष शिबू शेख, जिल्हा सरचिटणीस सुजाता परब,सोनिया गांधी ब्रिगेडीयर्स प्रदेश अध्यक्ष रीमा खांडेकर आणि कार्यकर्ता लवेश कुबल यांनी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला.जिल्हा उपाध्यक्षा वर्षा गुजर –जगताप म्हणाल्या, नागरिकांना पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे.रहिवाश्यांना पाणी देण्यास हे प्रशासन कमी पडत आहे. त्यामुळे आगामी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत रहिवाश्यांनी मतदानावर बहिष्कार टाका. तर जिल्हा उपाध्यक्ष शेख म्हणाले,पालिका अधिकाऱ्यांनी खुर्ची खाली करावी. तर येथील रहिवाशी मीना सिंग म्हणाल्या, जर पाणीच देऊ शकत नाहीत तर पालिका इमारतीच्या बांधकामांना का परवानगी दिली जाते.तर नीलम वायळ म्हणाल्या, आम्ही राहण्यास आलो तेव्हापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पालिका कर घेऊनही पाणी का मिळत नाही. येथील रस्त्यावर पथदिवे नाही. कचरा प्रश्न सुटला नाही. इतकी वर्ष त्रास आता सहन करू शकत नाही.दरम्यान या आंदोलनानंतर पालिका प्रशासन जागे झाले नाहीत तर आम्हाला पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल असा निर्णय यावेळी आंदोलन करणाऱ्या रहिवाश्यांनी घेतला.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...