Thursday, 21 October 2021

काचेच्या आडून शाहरुख खानने घेतली आर्यन खानची भेट; हा महिना आर्थर रोड तुरुंगातच काढावा लागणार.!

काचेच्या आडून शाहरुख खानने घेतली आर्यन खानची  भेट; हा महिना आर्थर रोड तुरुंगातच काढावा लागणार.!


भिवंडी, दिं,22, अरुण पाटील (कोपर) :
            शाहरूख खान  याचा मुलगा आर्यन खान याला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 3 ऑक्टोबर रोजी एनसीबीने त्याला अटक केली होती. मात्र अद्यापही त्याला जामीन मिळू शकलेला नाही. मुंबई कोर्टाने आर्यन खान याचा जामीन अर्ज  फेटाळला आहे. शाहरुख खान हा मुलगा आर्यन खान याच्या भेटीसाठी आर्थर रोड जेलमध्ये  आला होता.
        साधारण 16 ते 18 मिनिटं दोघांचं बोलणं झालं. भेटीदरम्यान वडील आणि मुलादरम्यान काच होती. याच्या आडून दोघांमध्ये संवाद झाला. दोघांची इंटरकॉमच्या माध्यमातून बातचीत झाली. यावेळी तुरुंगाचे अधिकारीही उपस्थित होते. कोरोनामुळे कैदींच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटीची परवानगी नाही. यापूर्वी शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हिने व्हिडीओ कॉलवरुन आर्यनशी बातचीत केली होती.
           आर्यन खान गेल्या 14 दिवसांपासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. एनसीबीने त्याच्यावर ड्रग्ज घेणे आणि इंटरनॅशनल ड्रग्ज ट्रॅफिकिंगशी संबंधित आरोप लावला आहे. आर्यन खानच्या जामीनाचा अर्ज आजही कोर्टाने फेटाळला असून 30 ऑक्टोबरपर्यंत त्याला आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागणार आहे. दरम्यान आर्यन खान याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...