भिवंडी पालिकेची शिक्षक,कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट,7 वा वेतन आयोग केला लागू .!!
भिवंडी, दिं,22, अरुण पाटील (कोपर) :
भिवंडी शहर महानगर पालिकेतील कर्मचारी, शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी यांना दिवाळीची गोड भेट म्हणून सातवा वेतन लागू करण्याची घोषणा पालिकेच्या महापौर प्रतिभा पाटील यांनी केल्यामुळे कर्मचारी व शिक्षक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.शिक्षक संघटनेच्यावतीने माजी सभापती राजू गाजेंगी यांनी महापौर प्रतिभा पाटील, कोणार्क विकास आघाडीचे गटनेते विलास पाटील यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्य शासनाने जानेवारी 2016 पासून कर्मचारी व अधिकारी यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे परंतु भिवंडी महानगर पालिकेत काम करणाऱ्या कर्मचारी व शिक्षक वर्गाला सातवा वेतन आयोग लागू न झाल्याने भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष भानुदास भसाळे व शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजू गाजेंगी यांनी शिक्षक संघटनेच्यावतीने लेखी निवेदन देऊन तातडीने सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा अशी मागणी केली होती अखेर महापौर प्रतिभा पाटील यांनी महापालिका आयुक्त प्रशासन व गटनेते नगरसेवकांशी चर्चा करून पालिका कर्मचारी व शिक्षकांना दिवाळीची गोड भेट म्हणून सातवा वेतन आयोग लागू केल्याची घोषणा केली.त्यामुळे शिक्षक संघटनेचे प्रमुख व शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजू गाजेंगी, शिक्षक सेनेचे अरुण भोईर, उपेंद्र संभारी, कृष्णा गाजेंगी सागर भोईर, मनोज वसेकर, नरेंद्र गुज्जा, पंकज परदेशी, नबील मोमीन, नासिर शेख आदी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षकांनी महापौर प्रतिभा पाटील यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले आहेत.

No comments:
Post a Comment