Thursday, 21 October 2021

संपावर राज्यातील तलाठी ! आडवी पडलीय खलाटी !! पंचनामे कोण करणार ...? राज्यातील शेतकरी हवालदिल...

संपावर राज्यातील तलाठी ! आडवी पडलीय खलाटी !! 

पंचनामे कोण करणार ...?  राज्यातील शेतकरी हवालदिल... 
     
 
       बोरघर / माणगांव, ( विश्वास गायकवाड ) : संपूर्ण राज्यभरातील तलाठ्यांनी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या जगताप नावाच्या व्यक्तीवर कारवाई करण्यासह आपल्या इतर मागण्यांसाठी राज्यस्तरीय संप पुकारला आहे. परंतू नेहमी पेक्षा हा संप दीर्घकाळ सुरु असल्याने 
शेतक-यांना इ पीक पाहणी मार्गदर्शन, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतातील उभे पीक पुर्णपणे आडवे झाले आहे. काही पाणथळ ठिकाणी पाण्यात पडलेल्या भाताच्या लोंबींना अक्षरशः मोड आलेले आहेत. सदर झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे इत्यादी महत्वपूर्ण बाबींसह सातबारा वर बोजा चढवणे, नोंदी टाकने, आपापल्या सजातील महत्वपूर्ण नमुना नंबर च्या सर्व क्रमिक महसुली दप्तर अद्ययावत करणे आदी निकडीची कामे खोळंबली आहेत.   
       शेतकऱ्यांना, जमीनदारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, न्यायालयीन कामासाठी सातबारा मिळणे दुरापास्त झाले आहे.   
      तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य शेतकरी वेठीस धरला जात आहे किंबहुना भरडला जात आहे. शासनाने आणि महसूल प्रशासनाने लवकरात लवकर या बाबीची गंभीर दखल घेऊन तलाठी, मंडळ अधिकारी, कर्मचारी आंदोलकांच्या न्याय्य मागण्यांचा शासनस्तरावर विचार करून त्यांना म्हणजे तलाठी, मंडळ अधिकारी, कर्मचारी यांना योग्य न्याय देऊन आंदोलन मुक्त करुन राज्यातील सर्व सामान्य शेतकरी, बागायतदार, जमिनदार यांच्या दैनंदिन महसूल सेवेसाठी रुजू करावे अशी राज्यातील सर्व सामान्य शेतकरी वर्गाकडून आग्रही मागणी होत आहें.
      महसुलीय इ-पीक पहाणीची मुदत संपल्याने मोबाईल आणि नेटवर्क सुविधा सर्वत्र नसलेल्या शेतकऱ्यांची पिक पहाणी राहून गेल्याने त्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आसुन तलाठ्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ते दररोज तहसील कचेरीत हेलपाटे घालत आहेत. तर पीक नुकसानीचा पंचनामे, सातबारा वरील नोंदी फेंर फार कामासाठी राज्यातील सर्व तहसील कार्यालयात अर्जांचा खच पडत आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने राज्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी आणि कर्मचारी यांना जास्त ताटकळत न ठेवता त्यांच्या मागण्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करून त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...