राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर !! आज पदभार स्वीकारणार !!
आता ही जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे देण्यात आली आहे. काल राज्य शासनकडून जीआर काढून नियुक्ती झाली असल्याबाबतची अधिकृतपणे घोषणा केली आहे.
नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. रुपाली चाकणकर सोशल मीडियावर सक्रिय आहेत सोबतच त्या महिला अत्याचार प्रकरणावर नेहमी भाष्य करत असतात.
आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यावर आहे.


No comments:
Post a Comment