Sunday, 17 October 2021

दसऱ्याचे औचित्य साधत केडीएमसीच्या आरक्षित भूखंडावर सुरु झाले कबड्डीचे मैदान !!

दसऱ्याचे औचित्य साधत केडीएमसीच्या आरक्षित भूखंडावर सुरु झाले कबड्डीचे मैदान !!


कल्याण, ऋषिकेश चौधरी : कल्याण डोंबिवली महापालिकेतील आरक्षित भूखंडाचे अतिक्रमनापासून संरक्षण करण्यासाठी त्याठिकाणी वृक्षारोपण करुन खेळाची मैदान सुरु करण्याचा मानस यापूर्वीच महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला होता. 


दसऱ्याचे औचित्य साधत कल्याण नजीक आंबिवली येथील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर कबड्डी खेळाचे मैदान सुरु करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते खेळाच्या मैदानाचा शुभारंभ करण्यात आला. 


पावसाळ्य़ात याच भूखंडावर आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानंतर आज त्याच आरक्षित भूखंडावर खेळाचे मैदान तयार केले आहे. मोहने आंबिवली परिसरातील कबड्डी खेळाडूंनी खेळात चांगले नाव कमाविले आहे. आणखीन काही खेळाडू या भागातून तयार होत आहे. त्यासाठी हे मैदान उपयुक्त ठरणार आहे. महापालिका हद्दीत आरक्षित भूखंडांवर क्रीकेट अकादमी आणि स्विमिंग कोचिंगसाठी तरण तलाव बाधण्यात येईल असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. कल्याण डोंबिवलीतून जास्तीत जास्त खेळाडून तयार व्हावेत. त्यांनी खेळात राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावावे याकरीता त्यांच्या खेळासाठी आरक्षित भूखंडावर मैदान उपलब्ध करुन दिली जातील असे आयुक्तांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...