Tuesday, 5 October 2021

तळा नगरपंचायत येथील शेतकरी सरकारी योजनां पासून वंचित !! 'अधिकारी वर्गाच्या गलथान धोरणामुळे शेतकऱ्यांची परवड' : महंमद भाई परदेशी...

तळा नगरपंचायत येथील शेतकरी सरकारी योजनां पासून वंचित !! 
'अधिकारी वर्गाच्या गलथान धोरणामुळे शेतकऱ्यांची परवड' : महंमद भाई परदेशी...


      बोरघर / माणगांव, ( विश्वास गायकवाड ) : गेल्या पाच वर्षांपासून तळा ग्रामपंचायतीचे तळा नगरपंचायत मध्ये रुपांतर झाले आहे. समस्त तळा वाशीयांसाठी ही बाब आनंदाची आहे मात्र तळा नगरपंचायत कार्यक्षेत्रात एकूण १२ वाड्या आहेत. या १२ वाड्यात ७०% शेतकरी वर्ग आहे. हे सर्व शेतकरी अधिकारी वर्गाच्या टोलवाटोलवी च्या धोरणांमुळे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकरी योजनां पासून वंचित आहेत. 
       या बाबतीत शेतकऱ्यांनी व बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चौकशी केली असता तुम्ही  तळ्या मधील आहात त्यामुळे तुम्ही तळा नगरपंचायती कडे जा असे त्यांना वारंवार सांगितले जाते. नगरपंचायती मध्ये बाधकाम सभापती आहेत. शिक्षण सभापती आहेत. आरोग्य सभापती आहेत, मग कृषी खात्यानेच असे काय केले की, त्याला सभापती नाही. यामुळे तळा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील १२ वाड्यातील शेतकरी कृषी तथा शेतकरी योजनां पासून वंचित आहेत. सदर बाब आमदार आणि पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली आहे तरी संबंधित विभागाने आणि शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे असे तळा तालुका बळीराजा शेतकरी संघटना सदस्य महम्मद भाई परदेशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...