Tuesday, 5 October 2021

घाटकोपर पश्चिम येथील इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश !!

घाटकोपर पश्चिम येथील इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश !!


मुंबई, (केतन भोज) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकोपर 
पश्चिम तालुकाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुहेल सुबेदार यांच्या उपस्थिती मध्ये घाटकोपर पश्चिम तालुक्यातील इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश 


रविवार दि.०३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता घेण्यात आला. सदर कार्यक्रमात वार्ड क्रमांक १२३ चे वार्ड अध्यक्ष शंकर महाडिक यांच्या प्रयत्नाने व वार्ड क्रमांक १२६ चे अध्यक्ष राजेंद्र केदारे तसेच वार्ड क्रमांक १२९ चे वार्ड अध्यक्ष असिफ शेख व सुनील चव्हाण (तालुका सरचिटणीस) यांच्या  प्रयत्नाने पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमासाठी हिराचंद सूर्यवंशी, सिराज खान, अनवर दळवी, संतोष पोळ, मंगेश शेवाळे व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी ,मुंबई, जिल्हा, तालुका सदस्य, फ्रंटल प्रमुख, उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन घाटकोपर तालुका अध्यक्ष सुरेश विठ्ठल भालेराव यांनी केले होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...