अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनासह नामफलकांचे अनावरण संपन्न...!
_"आदर्श सुनबाई" पुरस्काराने कर्तुत्ववान महिलांचा गौरव._
-------------------
ओझर, (प्रतिनिधी) : अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व मिलिंद नगर येथील शाखा नामफलकाचे अनावरण जेष्ठ लेखक साहित्यीक माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांचे हस्ते संपन्न झाले. ओझर येथील सरकार वाडा, स्वामी समर्थ नगर, भिमनगर, श्रमीकनगर, उद्देश नगर या ठिकाणी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती च्या शाखा नामफलकांचे अनावरण समितीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे हस्ते करण्यात आले.
उद्घाटनानंतर डाॅ.आंबेडकर सभागृहात आदर्श सुनबाई पुरस्कार वितरण व नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचा पदग्रहण सोहळा रविंद्रदादा जाधव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी विचारपीठावर माजी न्यायाधीश अनिल वैद्य, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डाॅ.रमेश सावंत, (कार्याध्यक्ष, अ.अ.नि.स.) प्रकाशजी पगारे, (आरपीआय नेते) प्रा. प्रेमलताताई जाधव, (उपाध्यक्षा, अ.अ.नि.समिती) महेंद्र तथा अण्णासाहेब पंडीत, (प्रदेश-सरचिटणीस, अ.अ.नि.समिती) हेमंतभाऊ जाधव, ( मा.सरपंच,ओझर मिग) विनोदभाऊ जाधव, (रिपाइं, जिल्हाध्यक्ष) गुड्डभाई सैयद, (प्रदेशाध्यक्ष, मानवाधिकार संघटना) लहरे (शिवव्याख्याते) इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून विचारमंघावर उपस्थित होते. यावेळी मान्यवर पाहुण्यांनी आपले विचार प्रकट करुन अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेच्या कार्याचा गुणगौरव केला.संघटनेच्या वतीने समाजातील कर्तुत्ववान महिलांना "आदर्श सुनबाई" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या मध्ये प्रामुख्याने मंदाकिनी चंद्रकांत जाधव, म्हाळसा पप्पु जाधव, माधुरी राजेंद्र बागुल, चित्रलेखा प्रदीप खरे, गायकवाड, संगिता जाधव, रुख्तार खाटीक, आदींना शाल, फेटा, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह, गुलाबगुच्छ देवुन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशालीताई मिलिंद जाधव यांनी केले तर सुत्रासंचालन प्रदीपनाना गांगुर्डे यांनी केले.
या कार्यक्रमात अ.आ.नि.स.च्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर वसंतराव वाघ मामा यांची तर अमरावतीच्या अरुणा इंगोले यांची विदर्भ विभाग प्रमुख पदी, राहुल पवार मालेगांव तालुकाध्यक्ष व मायाताई आहीरे यांची अंबरनाथ तालुकाध्यक्ष पदावर निवड करुन त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच नाशिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदावर संदीप अशोक साबळे आणि ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदावर पत्रकार लक्ष्मण पवार यांची निवड करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
या दिमाखदार सोहळ्यात आर्केस्ट्रा शोमॅन हा मनोरंजन व प्रबोधनात्मक गितांचा कार्यक्रम सादर करुन गायक जितुभाई देवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमास शोभाताई नगराळे, राजेंद्र साळवे, जोशिला पगारिया, ममताताई पुणेकर, रफीक सैयद, टीकुभाई कोहली, मनिषा पवार, राधा क्षिरसागर, संजय गायकवाड, मोहन जावळे, बाळा पठाडे, अशोक बागुल, सुदेश गांगुर्डे, ज्योती काजळे, रेखाताई मंजुळकर, शिल्पा झारेकर, यमुना लिंगायत, वर्षाताई आहीरे, माॅडेल संदेशा पाटील, निर्मला गायकवाड, संजय भोजणे, रवि गमरे, आनंद गांगुर्डे (कल्याण) प्रियंका व्दिवेदी, शशीकांत अढांगळे, सुनिता वाघ, सरला जंगले, आदीसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशीभाऊ जाधव, शिलाताई जाधव, राजाभाऊ सोनवणे, प्रशांत ढेंगळे, रेखाताई जाधव, घनश्याम जाधव, संदीप साबळे, गोकुळ बागुल, कोमल जाधव, जोगेंद्र जाधव, सागर जाधव, चार्वाक जाधव, शशांक जाधव, शारदाताई जाधव, आशाताई जाधव, कुणाल जाधव, भुषण जाधव, ताईबाई पवार, भारती साळवे, आदींनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार शशीभाऊ जाधव यांनी मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







No comments:
Post a Comment