Tuesday, 5 October 2021

खेळाडूंना दहावी व बारावी सवलतीचे गुण मिळाले पाहिजे - "नामदेव शिरगावकर" कल्याण मधील सन्मान महाराष्ट्राचा गौरव क्रीडा क्षेत्राचा या कार्यक्रमात अनेक क्रीडा दिग्गज यांची उपस्थिती !!

खेळाडूंना दहावी व बारावी सवलतीचे गुण मिळाले पाहिजे - "नामदेव शिरगावकर"


कल्याण मधील सन्मान महाराष्ट्राचा गौरव क्रीडा क्षेत्राचा या कार्यक्रमात अनेक क्रीडा दिग्गज यांची उपस्थिती !!

कल्याण, प्रतिनिधी : - ठाणे जिल्हा एकविस क्रीडा स़घटनांनी एकत्र येऊन, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य नागरी सत्कार व क्रीडा चर्चासत्र सोमवार ४ ऑक्टोबर २०२१ रोजी कल्याण एज्युकेशन सोसायटीच्या के. सी. गांधी शाळेच्या बंदिस्त सभागृहात 'सन्मान महाराष्ट्राचा! गौरव क्रीडा क्षेत्राचा!!' हा सत्कार सोहळा व 'महाराष्ट्राचे बदलते क्रीडा धोरण' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ठाणे जिल्ह्यातील शासनमान्य क्रीडा संघटनांचे निवडक प्रतिनिधी, शाळा व महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.


महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे महासचिव व भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उपाध्यक्ष संजय शेट्ये, खजिनदार धनंजय भोसले, सहसचिव दयानंद कुमार, सदस्य राजेंद्र घुले, राजेंद्र कोळी, दीपक मेजारी, निलेश जगताप, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव विजय संतान, टोकियो ऑलिंपिक चे निरिक्षक अशोक दुधारे, क्रीडा संघटक सुनिल पूर्णपात्रे, महेंद्र मोकाशी या मान्यवरांचा भव्य सत्कार स्वागत समितीच्या माध्यमातून करण्यात आला. विशेष उपस्थिती म्हणुन ठाणे जिल्हा फुटबॉल, संघटनेचे अध्यक्ष व आमदार गणपत गायकवाड व महाराष्ट्र क्रीडा संघर्ष समितीचे अध्यक्ष व मा. आमदार नरेंद्र पवार हे उपस्थित होते.


ठाणे जिल्हा एकविध क्रीडा स्वागत समितीचे कार्याध्यक्ष प्रा. उदय नाईक यांनी प्रास्ताविकात एकविध क्रीडा संघटनांचा हेतू स्पष्ट केला व खेळाडूंच्या व्यथा मांडत, ठाणे जिल्ह्यातील सर्व एकविध स़घटनांच्या एकजूटीची हाक दिली. ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी खेळांच्या स्पर्धा कमी खर्चामध्ये कशा चांगल्या होतील याकडे स्पर्धा आयोजन समितीने लक्ष देणे गरजेचे आहे.. स्पर्धांवर नाहक खर्च करण्यापेक्षा खेळाडूंवर खर्च करावा तसेच खेळाडूंना दर्जेदार सुविधा द्याव्यात असे सांगितले.. तर महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समितीचे अध्यक्ष मा. आमदार नरेंद्र पवार यांनी खेळाडू व खेळातील समस्या व्यक्त केल्या तसेच  कबड्डीच्या राष्ट्रीय स्पर्धा कल्याण येते झाली तर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. 


ऑलिम्पिक सचिव नामदेव शिरगावकर यांनी
खेळाच्या विकासासाठी, खेळ तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच खेळाच्या साधनसामग्री खेळाडूंना उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन कटिबद्ध राहिलं, ठाणे जिल्ह्यात तायक्वांडो खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन सहकार्य करण्यासाठी तयार आहे तसे्च खेळाडूंना दहावी आणि बारावी चे सवलतीचे गुण मिळाले पाहिजे तसेच नोकरीतील आरक्षण या मुद्यांवर क्रीडा धोरणात मार्गदर्शक तत्वांवर निश्चित विचार करण्यात येईल याची शाश्वती दिली तर स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव विजय संतान यांनी पालकांनी आपल्या पाल्यासाठी खूप जागरूक राहिले पाहिजे हे सांगताना बुलढाण्यातील पालकांनी गत चार वर्षे दिवाळी व मुलांचे वाढदिवस साजरे न करता तो खर्च खेळाच्या साहित्यावर केला त्यामुळे स्पर्धेत घवघवीत यश मिळाले. आपल्याकडे उत्तम दर्जाची साधनसामग्री उपलब्ध नसल्याने खेळाडूंच्या दर्जेदार खेळावर व शारीरिक क्षमतेवर परिणाम कसा होतो हे विविध दाखले देऊन व्यथा मांडली तर टोकियो ऑलिंपिक निरिक्षक अशोक दुधारे यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे  कार्यकारिणी चे अभिनंदन करुन आता तरुण तडफदार कार्यकर्त्यांकडून क्रीडा क्षेत्रात निश्चितच विकास होईल अशी खात्री व्यक्त केली. ठाणे जिल्हा एकविध क्रीडा स्वागत समितीचे अध्यक्ष संदीप ओंबासे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले तसेच या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील सर्व एकविध संघटना एकत्र आल्या त्याबद्दल भविष्यात सर्व संघटनांच्या संघटित होण्याविषयी आवाहन केले.

सत्कार सोहळा यशस्वी होण्यासाठी ठाणे जिल्हा एकविध क्रीडा स्वागत समितीचे अध्यक्ष संदीप ओंबासे यांच्या उत्साहपूर्ण नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष प्रा. उदय नाईक, कार्यवाह लक्ष्मण इंगळे, सहकार्यवाह संतोष पाठक, ग्लोबल महाविद्यालयाच्या प्राचार्या सुप्रिया नाईकर, उमेश काळे, महादेव क्षीरसागर, कृष्णा माळी, अशोक घोडके यांनी मेहनत घेतली तर स्वागत समितीचे संयोजक शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी अंकुर आहेर यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...