मुलाला विष पाजून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !!
महिलेवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून, ती बेशुद्ध आहे. सरितादेवी महेंद्रकुमार (२०) असे महिलेचे नाव असून, मृत झालेल्या मुलाचे नाव ऋषभ आहे. सरितादेवीचे आपल्या सख्ख्या बहिणीचा पती राजकुमार महंतो याच्यासोबत प्रेमसंबंध होते. तिने त्याच्यामागे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता; मात्र राजकुमारने लग्न करण्यास नकार दिल्याने सरितादेवीने रविवारी (ता. ३) दुपारी ३ वाजता स्वत: विष प्राशन केले. त्यानंतर तिने आपल्या मुलालाही विष दिले.

No comments:
Post a Comment