"कलगी-तुरा" समाज उन्नती मंडळ मुबंई तर्फे महाड येथे जाखडी नृत्य स्पधेचे आयोजन !!
मुंबई, (दिपक कारकर) :
सातत्याने तब्बल साठ वर्ष कलगी तुरा ही लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाच्या वतीने महाडच्या खाडीपट्टयात गौरी-गणेश जाखडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भवानी माता मंदिर, भवानी नडगाव, ता.महाड येथे शनिवार दि. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्रौ ८ वा. ही स्पर्धा संपन्न होईल. कोव्हिड - १९ बाबत संसर्ग विषयी प्रतिबंध तसेच लसीकरण या जन-जागृतीपर कार्यक्रम शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या नियम आणि सूचनेनुसार ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
ही लोककला जाखडी नृत्य, तमाशा, शाहीरी, भजन, भारुड ग्रामीण लोकभिमुख कला असून त्यात उत्तरोत्तर वाढ होत आहे, कारण लोककलेची अभिरुची व आस्वाद अन्य कोणत्याच कलाक्षेत्रात नाही त्यामुळे या कलेचा कोकणातील कोकणवासीयांना मोठे आकर्षण आहे. ही लोककला जिवंत ठेवण्याचं कार्य गेली साठ वर्ष अखंडपणे कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
या नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्रक, ढोलकी अशी पारितोषिके दिली जाणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कवी पारितोषिक, उत्कृष्ट ढोलकीपटू पारितोषिक, उत्कृष्ट गायक पारितोषिक, नुत्यकलाकार, पारितोषिक यांची देखील निवड करुन त्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक स्मृतीचिन्ह/ सन्मानपत्रक देवून गौरविले जाणार आहे. तसेच सहभागी कलापथकांना देखील सन्मानपत्रक व ढोलकी दिली जाणार आहे. शिवाय वरीष्ठ शाहीरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई आयोजित या रायगड, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील गौरी गणेश जाखडीनृत्य स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत असून ग्रामीण जनतेला या कलेचे मोठे आकर्षण असल्यामुळे ही लोककला जिवंत ठेवण्याचे काम शाहीर वर्ग करत आहेत, त्यासाठीच तळागाळातील लोककलावंताना आपली लोककला सादर करून त्यांना व्यासपीठ देण्याचे काम मुंबई मंडळ करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष तांबे साहेब, सरचिटणीस संतोष धारशे, चिटणीस सुधाकर मास्कर, खजिनदार सत्यवान यादव, सुरेश चिबडे व सर्व कार्यकारणी पदाधिकारी संयोजक, भवानी नडगाव ग्रामस्थ विशेष मेहनत घेत आहेत. या उपक्रमाला प्रतिवर्षी उत्तम प्रतिसाद मिळत असून सर्वांनी उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment