Friday, 12 November 2021

मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी-- "भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांची मागणी"

मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी--                                                                                             "भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांची मागणी"


कल्याण, ऋषिकेश चौधरी : केंद्र सरकारने पेट्रोल - डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल - डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी  तहसीलदार यांना दिले आहे. 


या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट व अन्य करत कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल - डिझेल दरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर  आघाडी सरकारने इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे, अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे. मात्र इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारला दूषणे देणाऱ्या आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्यासाठी अजून हालचाली केल्याचे दिसले नाही.


यावरून आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे आंदोलन हे केवळ ढोंग होते, असेच सिद्ध होते. भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी करात तातडीने कपात केली आहे. देशातील २२ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल डिझेलच्या दरात जनतेला आणखी  सवलत दिली आहे. महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या करात कपात करावी , असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, युवा अध्यक्ष मिहीर देसाई, कल्याण पश्चिम महिला अध्यक्ष रेखा म्हात्रे,  कल्याण पूर्व अध्यक्ष, संतोष शिंगोळे, मोहणे, संतोष होळकर, 
कल्याण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, भारतीय जनता पक्ष, टिटवाळा मंडळ सरचिटणीस, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...