जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांचे ग्रुप ग्रामपंचायत जांभूळच्या वतीने स्वागत !!
कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारल्यापासून पहिल्यांदाच कल्याण तालुक्याला भेट देणाऱ्या डेप्युटी सीईओ अविनाश फडतरे यांचे ग्रुप ग्रामपंचायत जांभूळचे सरपंच परिक्षित पिसाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कल्याण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ एक आदर्शवत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. सर्व सुखसोयी व विविध विकास कामे येथे मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली आहेत. येथील सरपंच परिक्षित हिराजी पिसाळ, उपसरपंच सुनीता गोरे व सर्व सदस्य आणि ग्रामसेवक बाळू कोकणे यांच्यातील उत्तम समन्वय यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी हातात हात घालून काम कसे करावे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जांभूळ ग्रामपंचायत होय.
याच ग्रामपंचायतीच्या परिसरात ठाणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक घेण्याचे नियोजन सुरू आहे. याकरिता परिसराची पाहणी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अविनाश फडतरे यांनी नुकतीच कल्याण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जांभूळ ला भेट दिली. यावेळी सरपंच परिक्षित पिसाळ यांनी फडतरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांचेही स्वागत केले.
यावेळी विस्तार अधिकारी श्री चव्हाण, ग्रामसेवक बाळू कोकणे आदी उपस्थित होते. डेप्युटी सीईओ अविनाश फडतरे यांनी भेटीदरम्यान समाधान व्यक्त केले.




No comments:
Post a Comment